Morning Swearing
Morning Swearing 
महाराष्ट्र

Sharad Pawar : पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीस स्पष्टच बोलले, शरद पवारांशी चर्चा...

सकाळ डिजिटल टीम

पुन्हा एकदा पहाटेचा शपथविधी चर्चेत आला आहे. यावेळी पक्षांमधील नेते न बोलता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. त्यांनी मोठं वक्तव्य करत पहाटेच्या शपथविधीमागचा गौप्यस्फोट केला आहे. (Morning Swearing Devendra Fadnavis Ajit Pawar NCP Sharad Pawar maharashtra politics)

23 नोव्हेंबर 2019 च्या सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठं वळण मिळालं. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण हे सरकार 72 तासांमध्येच कोसळलं आणि राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकासआघाडी सरकार आलं. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट वक्तव्य केलं नसली तरी फडणवीस यावर स्पष्ट बोलले आहेत.

टीव्ही-9 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.

काय म्हणाले फडणवीस?

'आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली, की आम्हाला स्टेबल गव्हर्नमेंट हवंय, म्हणून आपण सरकार तयार करूया. राजकारणात जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देतो, तेव्हा चेहरा पाहत बसता येत नाही. मग आम्हीही निर्णय केला. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली.

जी चर्चा झाली होती ती शरद पवार साहेबांशीच झाली होती. शरद पवारांशी चर्चा झाली त्यानंतर गोष्टी ठरल्या. त्या ठरल्यानंतर गोष्टी कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे, त्यामुळे त्याठिकाणीही आमच्यासोबत विश्वासघातच झाला.

पहिला विश्वासघात हा मी जास्त मोठा मानतो, कारण तो आपल्यासोबतच्या व्यक्तीने केला होता. हा छोटा होता,' असं फडणवीस म्हणाले.

तसेच, 'अजितदादांनी आमच्यासोबत घेतलेली शपथ फसवणुकीच्या नाही तर प्रामाणिक भावनेतून घेतली होती. पण नंतर ते कसे तोंडघाशी पडले हे अजितदादा सांगतील, त्यांनी नाही सांगितलं तर मी सांगीन,' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SCROLL FOR NEXT