रेवा जोगदंड वैमानिक अमेरिका 
महाराष्ट्र बातम्या

Motivational News : नांदेडच्या रेवा जोगदंडची आकाशी झेप; अमेरिकेत उडविले विमान

तालुक्यातील कोंढा (जि. नांदेड) येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने (ता. २०) अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली.

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : कोंढा गावची शेतकरी चळवळीत राज्यात ओळख आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय. येथील शेतकरी कष्टाळू तितकेच हौशी. येथील शेतक-यांनी आपल्या लाडक्या लेकीची पाठवणी हेलीकाॅप्टरने दोन वर्षंपुर्वी केली होती. ही घटना राज्यभर गाजली तर आत्ता येथील कन्येने चक्क अमेरिकेत विमान उडून एक मानाचा तुरा रोवला आहे. या जिगरबाज मुलीचे नवा रेवा जोगदंड असून तिच्या कर्तबगारीने कोंढेकरांचा ( ता. अर्धापूर ) उर भरुन आला आहे.

तालुक्यातील कोंढा (जि. नांदेड) येथील जोगदंड कुटुंबातील चौदा वर्षीय मुलीने (ता. २०) अमेरिकेत विमान उडवून आकाशात झेप घेतली. यामुळे हौसेसाठी काय पण करणारे कोंडा गाव पुन्हा चर्चेत आले आहे. तिच्या या कामगिरीने जोगदंड कुटूंबियासह संपूर्ण कोंढेकर ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरून आला आहे.

हेही वाचा - राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. राज्यात ४ जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती.

कोंढा येथील रहिवासी असलेले केशवराव बालाजी जोगदंड यांचा मुलगा दिलीप केशवराव जोगदंड हे २० वर्षांपूर्वी अमेरिकेला स्थायिक झाले आहेत. तेथे त्यांनी (स्ट्रिंग कंट्रोलेड) दोरीवर विमान उडवून दाखविणे या विषयी संशोधन करून यशस्वी प्रयोग केला. याचा परिणाम त्यांची मुलगी कु. रेवा दिलीप - जोगदंड यांच्या बालमनावर झाला. तेव्हापासून तिने भविष्यात पायलट होण्याचे स्वप्न उराशी बाळगून पुढील वाटचाल सुरु केली. आणि एक हे स्वप्न सत्यात उतरले. रेवा दिलीप जोगदंड (वय १४ वर्षे ) हीने ता. २० जून रोजी चक्क विमान उडवून आकाशात यशस्वी झेप घेतली आहे.

तिच्या या यशाची बातमी कोंढा येथे कळताच तिचे आजोबा केशवराव जोगदंड आणि संपूर्ण जोगदंड परिवारासह कोंढेकर ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला. आपल्या गावातील मुलीने अमेरिकेत जाऊन पायलट होण्याचे स्वप्न साकार केल्याबद्दल ग्रामस्थांचा उर अभिमानाने भरुन आला. अर्धापूर तालुक्यातील कोंढा हे गाव अतिशय लहान असून येथील व्यवसाय हा शेती आहे. तरीही शेती व्यवसायातून येथील काही सुज्ञ कुटुंबांनी मोठी प्रगती साधली आहे. त्याच बरोबर शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सात नवनवीन प्रयोग केले जातात.

येथे क्लिक करा - यंदा आषाढी वारी सरकारच्या वतीने विशेष वाहनाने पंढरपूरला जाणार आहे.

तर येथील काही नागरिकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी आत्मसात करुन नवनवीन व्यवसायात यशस्वी पाऊल टाकले आहे. मागील दोन वर्षांपूर्वी राम कदम या प्रगतीशील न शेतकऱ्यांनी आपल्या बहिणीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी न तिच्या लग्न समारंभात हेलीकॉप्टरमधून वरात काढून तिची सासरी पाठवणी केली होती. यामुळे कोंढा हे गाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले होते. आता १४ वर्षीय रेवाने विमानाने आकाशास गवसणी घातल्याने कोंढा गाव पुन्हा चर्चेत आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT