mp amol kolhe and mp supriya sule sakal
महाराष्ट्र बातम्या

Parliament Session : खासदार डॉ. अमोल कोल्हे व खासदार सुप्रिया सुळे यांचे निलंबन

आजवर आणीबाणी विषयी ऐकली होती. पण आज केंद्र सरकारची. अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली.

रवींद्र पाटे

नारायणगाव - आजवर आणीबाणी विषयी ऐकली होती. पण आज केंद्र सरकारची. अघोषित आणीबाणी प्रत्यक्ष अनुभवली. अशी संतप्त प्रतिक्रिया देत आता कांदा उत्पादक व सर्वसामान्य शेतकऱ्यांचा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल. असा इशारा संसदेच्या अधिवेशनादरम्यान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, अडचणी सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्यावरील निर्यात बंदी तत्काळ उठवावी. अवकाळी पाऊस आणि दुष्काळाने ग्रासलेल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या विषयावर आज गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि मी अधिवेशनात चर्चेची मागणी करत होतो.

मात्र कोणतीही चर्चा न करता आम्हा दोघांचेही थेट निलंबन करण्यात आल. या निर्णयाबाबत सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करताना खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, सरकारला फक्त 'मन की बात' करायची आहे, पण 'जन की बात' ऐकायची नाही हे दुर्दैव आहे.

अवकाळी पाऊसामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर इतकं मोठं संकट आलं असताना त्यावर कोणतीही चर्चा न करता निलंबनाची थेट कारवाई सरकारनं केली. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा हा लढा घेऊन रस्त्यावर उतरावं लागेल. असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

तोंड झाकलं की थेट रेड कार्ड! FIFA World Cup पूर्वी हे नवे नियम होणार लागू; खेळाडूंच्या टाईमपासला बसणार लगाम

Latest Marathi News Live Update : महागाईविरोधात भंडाऱ्यात शिवसेना (उबाठा)चा एल्गार; इंधन व गॅस दरवाढीविरोधात तीव्र आंदोलन

पहिला चित्रपट सुपरहिट मग लागली फ्लॉपची लाइन; एका रात्रीत स्टार झालेली गावाकडची साध्या घरातली मुलगी; तुम्ही ओळखलंत का?

"आपण का भीक मागायची त्यांच्याकडे?" सुकन्या मोने यांनी उघड केलं हिंदी मालिका सोडण्याचं खरं कारण, म्हणाल्या..

SCROLL FOR NEXT