Dr. Amol kolhe and Sudhanshu Trivedi 
महाराष्ट्र बातम्या

शिवाजी महाराजांवरील भाजप प्रवक्त्याच्या विधानाने MP कोल्हे संतापले; म्हणाले दळभद्री...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - भाजपच्या प्रवक्त्याने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्याचं राजकारण तापलं असून विविधी स्तरातून भाजपच्या विधानाचा निषेध नोंदवण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संताप व्यक्त केली आहे. (Dr. Amol Kolhe news in Marathi)

अमोल कोल्हे यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटलं की, डॉ. सुधांशू त्रिवेदीजी, छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने औरंग्याला फरफट करून या महाराष्ट्रात गाडलं. हाच खरा इतिहास आहे. तुमच्या दळभद्री वक्तव्याचा जाहीर निषेध! छत्रपती शिवराय आमची अस्मिता आहे, तिला कोणीही डिवचू नये, अशा शब्दात कोल्हे यांनी भाजपला खडसावलं.

भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. "शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती असं वादग्रस्त विधान त्रिवेदी यांनी केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Claims about Samosa, Jalebi, Laddu: 'समोसा, जिलबी अन् लाडू'बाबत सरकारने खरंच काही इशारा दिला आहे का?

Mumbai Local: वातानुकूलित प्रवास भोवला, फुकट्या प्रवाशांकडून चार कोटींचा दंड वसूल

Umarga Crime News : अनैतिक संबंध, चारित्राच्या संशयावरून महिलेचा खुन; उमरगा पोलिसांनी २४ तासात प्रियकराला केली अटक

Sarpanch Reservation : बीडमधील गेवराईत ७१ महिला होणार सरपंच, १३९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

Nina Kutina: गोकर्णच्या जंगलातील गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचा शोध कसा लागला? पोलिसांनी सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT