sharad pawar amol kolhe. sakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Kolhe : 'बाप नाही विसरायचा...',काल अजित पवारांना पाठिंबा अन् आज खासदार अमोल कोल्हे शरद पवारांसोबत

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास 40 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर शरद पवार या संपूर्ण घटनेनंतर अॅक्शनमोडमद्धे आले आहेत. तर काल पाठिंबा देणारे काही नेते आज शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगत आहेत. (Latest Marathi News)

तर खासदार अमोल कोल्हे यांनी काल अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज अमोल कोल्हे यांनी मी शरद पवार यांच्यासोबत असल्याचं म्हंटलं आहे. (Latest Marathi News)

अमोल कोल्हे यांनी यासंबधी एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यामध्ये एक व्हिडिओ आणि दोन ओळी त्यांनी लिहल्या आहेत.(Latest Marathi News)

अमोल कोल्हे शरद पवारांसोबत आहेत, असं त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हे यांनी ट्विटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अमोल कोल्हे शरद पवारांना भेटणार आहेत. मी शरद पवारांना भेटून माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं कोल्हे यांनी सांगितलं आहे.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीच्या आमदारांना 5 जुलैपर्यंतचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्याच दिवशी दोन्ही बैठकांचं नियोजन करण्यात आलं आहे. तर अल्टीमेटम दिल्यामुळे नेते आपली भूमिका स्पष्ट करत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT