Samruddhi Mahamarg AMOL KOLHE 
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर अमोल कोल्हेंनी शेअर केला जुना व्हिडिओ, म्हणाले...

कार्तिक पुजारी

मुंबई- समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स बसने ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यामुळे यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा ठरतोय अशी चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक जुना व्हिडिओ शेअर करुन काही निरीक्षणं मांडली आहेत.

व्हिडिओ शेअर करत कोल्हे म्हणाले की, आज पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याची बातमी वाचली. सर्व मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! (mp amol kolhe shear old video of samruddhi mahamarg accident news aurangabad)

जेव्हा आम्ही 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा प्रयोग छत्रपती संभाजीनगर येथे करत होतो, तेव्हा समृद्धी महार्गावरून प्रवास करण्याचा योग आलेला, तेव्हा मी माझा अनुभव सांगणारा एक व्हिडिओ आपल्या 'अमोलतेअनमोल' युट्युब चॅनेलवर पोस्ट केला होता. त्यामध्ये सर्वसामान्य जनतेचा विचार करून काही निरीक्षण मी मांडली होती. तो व्हिडीओ पुन्हा एकदा मुद्दामहून आपल्यासोबत शेअर करतोय, आवर्जून पहा!, असं ते म्हणाले.

दरम्यान, सैलानी येथील दर्गावरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ ही घटना घडली. मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतं. सर्व भाविक नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT