Amol Kolhe News esakal
महाराष्ट्र बातम्या

Amol Kolhe : पुस्तकावरील पोस्टमुळे झालेल्या चर्चेला अमोल कोल्हेंचं उत्तर; म्हणाले, 'त्या' विचारधारेचा...

संतोष कानडे

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल पुस्तक दिनानिमित्त एक ट्विट केलं होते.त्यामध्ये त्यांनी दोन पुस्तकं वाचतानाचे फोटो शेअर केले होते. एक पुस्तक शरद पवारांचं 'नेमकचि बोलणे' आणि दुसरं 'द न्यू बीजीपी' हे पुस्तकं ते वाचत होते.

या पुस्तकानंतर पुन्हा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. त्याला आज कोल्हेंनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी पोस्ट केली की लगेच बातम्या सुरु झाल्या, नक्की अमोल कोल्हेंना सुचवायचं काय? असे प्रश्न विचारले जावू लागले. मला एवढंच सुचवायचं होतं विचारधारा कोणतीही असो, आधी तिचा अभ्यास करावा लागतो. तो अभ्यास वाचनातून, साहित्यातून होतो. जेव्हा त्यातून समाजमन सुसंस्कृत होतं तेव्हा राजकीय साक्षरता येते. त्यासाठी वाचन आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचाः Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

काल केलेल्या ट्विटमध्ये कोल्हेंनी नेमकचि बोलणे हे शरद पवारांच्या भाषणाचं पुस्तक आणि नलिन मेहता यांचं द न्यू बीजेपी हे पुस्तक वाचतांनाचे फोटो शेअर केले होते. या फोटोवर अमोल कोल्हे यांनी 'विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरु कोण. वाचाल तर वाचाल! जागतिक 'पुस्तक' दिनाच्या शुभेच्छा!!' अशा ओळी शेअर केल्या होत्या.

मागे काही महिन्यांपूर्वी अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. शिवाय रावसाहेब दानवे यांच्याही भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या. कालच्या पोस्टने पुन्हा चर्चा सुरु झाल्या. मात्र आज त्यांनी त्याबद्दलचा खुलासा केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT