Shirdi
Shirdi esakal
महाराष्ट्र

Shirdi: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान साईदरबारी विलीन

रुपेश नामदास

आजपासून नवीन वर्ष 2022 सुरू झाले असून लोक या वर्षाची सुरुवात नव्या उत्साहाने आणि निर्धार करत आहेत. नववर्षाच्या स्वागताच्या या काळात दर्शनाची लगभग सुरू आहे. यानिमित्ताने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शिर्डीत साई बाबांचे दर्शन घेतले आहे.

शनिवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपल्या कुटुंबासह शिर्डी येथील साईबाबा मंदिरात जाऊन साईंची पूजा केली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी साधना सिंह आणि मुलगा कार्तिकेयही उपस्थित होते.

नववर्षानिमित्त मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी शिर्डीमध्ये येवून साईबाबा मंदिरात दर्शन घेवून प्रार्थना केली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी साईबाबांना मध्य प्रदेशातील लोकांच्या सुख, समृद्धीसाठी प्रर्थना केली.

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे त्यांना ट्विट केलं आहे की, नववर्षानिमित्त त्यांनी शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिरात जाऊन मध्य प्रदेश आणि देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. साईबाबांच्या आशीर्वादाच्या अविरत वर्षाव सर्वत्र सुख, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव होवो!

मुख्यमंत्री म्हणाले की, नवीन वर्षात नवा संकल्प, नवा जोश आणि नव्या उमेदीने स्वावलंबी मध्य प्रदेशची उभारणी करायची आहे. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला अनुकूल वर्तन करावे लागेल.

नवीन वर्षात समृद्ध आणि विकसित मध्य प्रदेश घडवण्याचा संकल्प आणखी पुढे न्यावा लागेल. देशाच्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा घेतली आहे.आपण सर्व मिळून मध्य प्रदेश आणि देशाच्या प्रगतीत योगदान देऊ या. असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणी मोठा निकाल ! दोघांना जन्मठेप, तिघांची निर्दोष मुक्तता

Narendra Dabholkar Case Live Updates: सुटलेल्या आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस, सरकार अपयशी: न्यायाधीश

Groundbreaking Gene Therapy : अवघ्या दीड वर्षांच्या कर्णबधीर चिमुकलीची श्रवणक्षमता आली परत; 'जीन थेरपी' मुळे घडला चमत्कार.!

Axis Bank: धक्कादायक! ॲक्सिस बँकेची 22 कोटी रुपयांची कर्ज फसवणूक! कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Watch Video: चक्क जन्मठेपेची शिक्षा झालेले 9 कैदी तुरुंगातून पास झाले बारावीची परीक्षा

SCROLL FOR NEXT