Sambhaji Nagar Controversy  
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Nagar Controversy : "...तोपर्यंत औरंगाबादचे नाव बदलू नये" मुंबई हायकोर्टाचा आदेश! इम्तियाज जलील म्हणाले...

Sandip Kapde

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी मंजूर केला. त्यानंतर या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. नाव बदलाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत सरकारी कागदपत्रांवर औरंगाबादचे नाव बदलू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावे बदलण्याच्या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान औरंगाबादच्या नामांतराविरोधात दाखल याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी आपली भूमिका मांडत शहरातील टपाल कार्यालये, महसूल, स्थानिक पोलीस आणि न्यायालयांमध्ये संभाजीनगर नावाचा उल्लेख करून त्याचा वापर केला जात असल्याची तक्रार केली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशावर खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत. ते शहराच्या बाबतीत नाहीत. तर जिल्हा आणि तालुक्याच्या बाबतीत आहेत. शहराच्या नामकरण संदर्भात केंद्र शासनाचा जीआर निघालेला आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो".

"केंद्र शासनाने हे प्रकरण न्याय प्रविष्ट असताना गडबडीत नाव बदलण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि न्यायालयाचा जो काही निकाल येईल तो आम्हालाही आणि सर्वांनाही मान्य असेल", असे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.

मुस्लिमबहुल प्रभागांमध्ये तातडीने नावे बदलण्याची मोहीम सुरू असल्याचा आरोपही याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यावर सुनावणी घेऊन नाव बदलाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत कागदपत्रांवर औरंगाबादचे नाव न बदलण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

सुनावणी होईपर्यंत सरकारी कागदपत्रांवर नावे बदलू नयेत, असे होत असेल तर ते त्वरित थांबवावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायालयाने ७ जूनपर्यंत सुनावणी तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT