mp navneet ranas bogus caste certificate case court rejected plea of acquittal in caste certificate verification case  esakal
महाराष्ट्र बातम्या

Navneet Rana News : नवनीत राणांची खासदारकी जाणार? जात प्रमाणपत्र प्रकरणी दोषमुक्तीला कोर्टाचा नकार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : खासदार नवनीत राणा यांना जात पडताळणी प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. आपल्यात करण्यात आलेले आरोपे चुकीचे असल्याचे राणा यांनी म्हटले होते, दरम्यान त्यांना दोषमुक्ततेसाठी अर्ज केला होता हा अर्ज न्यायलयाने फेटाळून लावला आहे.

सत्र न्यायालयाने हा निर्णय दिल्याने आता नवणीत राणा यांना समन्स देखील बजावण्यात आला होतं. त्यानंतर त्यांनी दोषमुक्ततेसाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला असून त्यानंतर आता राणा यांना पुन्हा उच्च न्यायालयात दोष मुक्ततेसाठी अर्ज करावा लागेल अन्याथा त्यांच्यावर खटला चालवला जाईल.

खासदार नवनीत राणा यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या मुंबई सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला नवनीत राणा यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

नेमकं काय आहे प्रकरण?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे वडिल हरभजन सिंग यांच्यावर मुंबईतील मुलूंड पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. नवनीत राणा यांनी त्यांच्या जातीचा बनावट दाखला दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या प्रकरणी शिवडी दंडअधिकारी न्यायालयात खटला चालू आहे. यानंतर राणा आणि त्यांचे वडील यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. जो दंडअधिकारी न्यायालयाने फेटळून लावला आहे. त्यानंतर या निर्णयाला नवनीत राणा यांनी मुंबई सत्र न्यायालयात विशेष कोर्टाने अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी करत सत्र न्यायालयाने शिवडी न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवून तोच निर्णय काय ठेवला आहे. त्यामुळे नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT