Nilesh Lanke 
महाराष्ट्र बातम्या

Nilesh Lanke: खासदार निलेश लंकेंचा गुंड गजा मारणेने केला सत्कार, वाद निर्माण होण्याची शक्यता

Gaja Marne Meet MP Nilesh Lanke: वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक यावरुन लंकेंना अडचणीत आणू शकतात.

कार्तिक पुजारी

नगर- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याच्याकडून सत्कार स्वीकारला आहे. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधक यावरुन लंकेंना अडचणीत आणू शकतात. गजा मारणे हा कुख्यात गुंड असून त्याने निलेश लंके यांची भेट घेतली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुंड गजा मारणे यांच्याविरोधात अनेक गुन्ह्याची नोंद असून त्यांच्याविरोधात अनेक खटले सुरु आहेत. यामध्ये अनेक गंभीर गुन्ह्याचा देखील समावेश आहे. मागे त्याने अजित पवार गटाचे पार्थ पवार यांची भेट घेतली होती, त्यावरुनही वाद निर्माण झाला होता. आता त्याने लंके यांची देखील भेट घेतली असल्याने यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

निलेश लंक हे नगर लोकसभा मतदारसंघामध्ये जायंट किलर ठरले होते. त्यांनी भाजपचे सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला होता. सुरुवातीला अजित पवार गटात असलेले लंके हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदारकी लढवण्यासाठी शरद पवार गटामध्ये आले होते. त्यांना खासदारकीचं तिकीट मिळालं. या संधीचा फायदा घेत त्यांनी लोकसभेचे रिंगण जिंकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT