महाराष्ट्र बातम्या

PM मोदींचे शिंदे गटाला दसरा गिफ्ट; केंद्रात दिली मोठी जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिंदे गटाला दसरा गिफ्ट दिलं आहे. शिंदे गटातील खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर केंद्राने मोठी जबाबदारी सोपवली आहे. मोदी सरकारकडून शिंदे गटाला पहिल्यांदाच अशाप्रकारे केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्यात आली आहे.( MP Prataprao Jadhav Appointedn Parliament by Modi government )

माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. संसदेच्या स्थायी समितीत काही महत्त्वाचे बदल केंद्र सरकारकडून करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिंदे गटालाही महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे.

याआधी काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचं अध्यक्षपद होतं. त्यांच्या जागी आता प्रतापराव जाधव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलीय.

मागील आठवड्यात प्रतापराव जाधव हे उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. सचिन वाझे 100 कोटी रुपयांची वसुली करुन मातोश्रीवर पोहोचवत होता. असा आरोप त्यांनी ठाकरेंवर केला होता. मात्र, काही तासांनंतर आपल्याला तसं म्हणायचं नव्हते असेदेखील स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT