Rahul Shewale News esakal
महाराष्ट्र बातम्या

Rahul Shewale Video : बाबासाहेबांना अभिवादन करण्यापासून राहुल शेवाळेंना रोखलं? व्हीडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. विविध पक्षांच्या नेत्यांनी महामानवाला अभिवादन करुन जयंती साजरी केली. मात्र शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांना अभिवादन करण्यापासून खरंच रोखलं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज दिवसभर एक व्हीडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. त्यामध्ये खासदार राहुल शेवाळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यापासून रोखलं जात असल्याचं दिसून येतंय. सकाळ माध्यम समूह या व्हीडिओची पुष्टी करीत नाही. मात्र राहुल शेवाळेंचा हा व्हीडिओ असल्याच्या चर्चा आहेत.

हेही वाचाः Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

व्हीडिओमध्ये खासदार राहुल शेवाळे यांना पुढे जाण्यापासून उपस्थित लोक रोखत आहेत. त्यांना विरोध होतांना दिसतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हार घालण्यापासून शेवाळेंना रोखलं जात असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं आहे.

दरम्यान, राहुल शेवाळे हे मागेही एकदा महिलेच्या प्रकरणावरुन चर्चेत आले होते. शेवाळे यांच्या विरोधात एका महिलेनं लैंगिक अत्याचार व मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. शेवाळे यांनी महिलेविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: ५ विकेट्स अन् अफलातून डायरेक्ट थ्रो... Deepti Sharma नं पाकिस्तानला फक्त रडवलंच नाही, तर विश्वविक्रमही केला

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT