MP SambhajiRaje 
महाराष्ट्र बातम्या

शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच : खासदार संभाजीराजे

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : "शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच. शरद पवार चुकीचे काय बोलले? शिवाजी महाराज कुळवाडीभूषण आहेत, अशीच माझी स्पष्ट भूमिका आहे,'' असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मंगळवारी (ता. 27) शाहू महाराज यांच्या जयंती कार्यक्रमासाठी आले असता, ते पत्रकारांशी बोलत होते. श्रीमंत कोकाटे यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवाजीराजे हे गोब्राह्मणप्रतिपालक नव्हते, असे मत पुण्यात व्यक्त केले होते. त्या मताशी संभाजीराजे यांनी सहमती व्यक्त केले. महात्मा जोतीराव फुले यांनी शिवाजीराजांना कुळवाडीभूषण संबोधले होते. हेच संबोधन योग्य असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. 

पुजाऱ्यांचे चूकलेच! 
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला घागरा-चोळी घातल्याने वातावरण चिघळले आहे; मात्र यात पुजाऱ्यांचीच चूक आहे. त्यांनी तसे करायला नको होते. तरीही या वादात मला पडायचे नाही, असे म्हणत अधिक प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

कर्जमाफीची सवय नको 
कर्जमाफीने सगळ्याच गोष्टी साध्य होतील असे नाही. यापुढेही पीक कमी येईल, दुष्काळ पडेल, या बाबी घडतच राहतील. मात्र, कर्जमाफीची सवय पडायला नको. दरवेळेस कर्जमाफी शक्‍य नाही. कुठेतरी "लाइन ड्रॉप' करावी लागेल, असे मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्‍त केले. या वेळची कर्जमाफी ही गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

संभाजीराजे म्हणाले की, कर्जमाफीसंदर्भात माझी भूमिका ही वेळ पडली तर कर्ज घ्या; पण शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, अशीच होती. गरज नसलेल्यांना ती देऊ नका. अल्पभूधारकांना लाभ व्हावा. मागच्या चुका आता नको. या बाबींची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कर्जमाफीत आहे. कर्जमाफीसोबत आता हमीभाव मिळणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येची विविध कारणे आहेत. यासाठी संघटनांनी प्रबोधन केले पाहिजे. शेतकऱ्यांकडे कार्यकर्ता नव्हे, तर शेतकरी म्हणून पाहिले पाहिजे. सरकारशी किती दिवस संघर्ष करायचा. कुठेतरी डेडलाइन ठरवायला हवी. मी नेतृत्व नाही, तर मराठा समाज आणि मुख्यमंत्र्यांचा दूत म्हणून काम करायला तयार आहे. चर्चा तुम्हीच करा, मुख्यमंत्र्यांकडे सन्मानाने घेऊन जाण्याची जबाबदारी मी पार पाडू शकतो, असे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ वर्षांत २४८ कोटी रुपये खर्च, मुंबईतील उड्डाणपुलावर भूकंपासारख्या भेगा; ३ महिन्यांत तिसऱ्यांदा वादाच्या भोवऱ्यात

Manoj Jarange Patil: ‘मागण्या मान्य करा, नाहीतर उडी घेऊ’; लातूरमध्ये मराठा तरुणांचा टोकाचा इशारा

Pune News : पुणे विद्यापीठासह तीन विद्यापीठांत आता ‘कुलपती पदक’; राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश

Marathi News Live Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune News : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार; त्रुटी आढळल्यास संस्थेवर कारवाई

SCROLL FOR NEXT