MP Sanjay Raut On NCP Chief Sharad Pawar attending opposition meeting in Bengaluru tomorrow  
महाराष्ट्र बातम्या

Opposition Meeting : शरद पवारांची विरोधीपक्षांच्या बैठकीला पहिल्या दिवशी दांडी; राऊत म्हणाले…

रोहित कणसे

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांकडून एकजूटीसाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमिवर बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधकांची पहिली बैठक झाली. त्यानंतर आता बंगळुरू येथे दोन दिवस (१७ आणि १८ जुलै) पुन्हा विरोधी पक्षांचे नेत एकत्र येणार आहेत. या बैठकील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जाणार होते मात्र अचानक पवारांनी त्यांचा कार्यक्रम रद्द केला आहे.

महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासोबतच शरद पवार देखील जाणार होते. मात्र आज अचानक शरद पवार जाणार नसल्याच समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यापूर्वी काल अजित पवारांनी समर्थक आमदारांसह शरद पवारांची भेट घेतली होती, यानंतर शरद पवारांच्या भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हे उद्या या बैठकीला उपस्थित राहतील अशी माहिती दिली आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट केलं की, "पाटणा बैठकी नंतर आज उदया होणारी बंगळुरू बैठक निर्णायक ठरेल. शिवसेना पक्षप्रमुखश्री. उद्धव ठाकरे हे बैठकीस उपस्थित राहतील. शरद पवार बैठकीस उपस्थित राहतील की नाही या बाबत संभ्रम निर्माण झाला होता.पवार साहेब उद्या सकाळी बंगळूरू येथील बैठकीस उपस्थित राहतील. हे मी खात्रीने सांगत आहे. हम सब एक है!"

यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून देखील याबद्दल माहिती देण्यात आली आहे. उद्या दिनांक १८ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार हे बंगळूरू येथे होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत, असे सांगण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या तयारीला वेग आला आहे. आज आणि उद्या कर्नाटकातील बंगळुरू येथे काँग्रेसने बोलावलेली ही दुसरी विरोधी पक्षांची एकता बैठक आहे. या बैठकीला जवळपास २४ राजकीय पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT