MP Sanjay Raut Slam BRS Telangana CM k chandrasekhar rao over pandharpur vitthal mandir Visit  
महाराष्ट्र बातम्या

KCR in Maharashtra : महाराष्ट्रात जेवणावळी अन् दिल्लीत पक्ष फुटला…; केसीआर यांनी उद्धव ठाकरे गटाचा टोला

रोहित कणसे

तेलगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे त्यांचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार यांना सोबत घेऊन दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. केसीआर यांनी आज पंढपूरातील विठ्ठल मंदिरात विठुरायाचे दर्शन देखील घेतले. आगामी विधानसभा निवडणीकीपूर्वी त्यांचा बीएसआर पक्ष महाराष्ट्रात हातपाय पसरू पाहतो आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून केसीआर यांच्या दौऱ्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केसीआर महाराष्ट्रात आले काय…ताफा घेऊन आले उमरखेड्यात जेवणावळी झाल्या, पंढरपूरला चालले आहेत हे शक्तिप्रदर्शन तुम्ही कोणाला दाखवताय?

महाराष्ट्रमध्ये येऊन आपला पक्ष तेलंगणात, आपण जरी भारतीय नाव केलं, तरी तुम्ही महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन करत असताना दिल्लीत तुमचा पक्ष फुटलाय. अनेक माजी मंत्री, अनेक माजी खासदार आणि प्रमुख नेत्यांनी काल काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. हा त्यांच्या पक्षाला सर्वात मोठा हादरा आहे त्यांचे प्रमुख लोक काँग्रेसमध्ये गेले.

तेलंगणातला हा जो पक्ष महाराष्ट्रात 600 गाड्या 700 गाड्या हे पैशाचा संपत्तीचं सत्तेचा ओंगळवान दर्शन आहे. जे शिंदे करतात. राज्याची जनता सुज्ञ आहे.

केसीआर भाजपची बी टीम

केसीआर हे भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे, हे स्पष्ट झालं आहे. याआधी एमआयएम हैदराबाद वरून आले होते, आता त्याच हैदराबाद वरून केसीआर आले आहेत असे संजय राऊत म्हणाले आहेत.

मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते विकत घेणे, प्रसिद्ध करणे हा पैसा इथे येतो कुठून याची चौकशी व्हायला पाहिजे असेही राऊत म्हणाले. त्यांचा स्वागत कसलं करता, इतक्या वर्ष पंढरपूरच्या विठ्ठलाकडे दर्शनासाठी आल्याचा माझ्याकडे इतिहास नाही.

केसीआर जवळ जवळ नऊ दहा वर्ष तेलंगणाचे किंवा आंध्रामध्ये मंत्री होते केंद्रात मंत्री होते इतक्या वर्षात स्वतः एकदा तरी सहकुटुंब पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेतलं का? आता पाचशे-हजार ताफा कोणाला दाखवता. केसीआर आमचे व्यक्तिगत मित्र आहेत. त्यांनी ठरवायला पाहिजे आपण नक्की कोणा बरोबर राहायला हवं असेही राऊतांनी यावेळी सांगितलं.

तेलंगणाबाहेर संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने राव यांनी १५ जून रोजी नागपुरात पक्षाच्या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते. महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केसीआरच्या नेतृत्वाखालील पक्षाने अखिल भारतीय पक्ष बनण्याच्या उद्देशाने तेलंगणा राष्ट्र समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती केले आहे.

याशिवाय राव यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या काही भागांत सभा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर शेतकरी आणि दलितांच्या प्रश्नावर टीका केली.

यानंतर आता महाराष्ट्रातील प्रचलित पक्ष सध्या वेगवेगळ्या जातीपातींमध्ये विभागलेलं आहे, याचा थेट फायदा महाराष्ट्रात बीआरएसला होऊ शकतो अशी चर्चा देखील महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:विहिरीत पडला बिबट्या, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

Mumbai News: ‘एल्फिन्स्टन’मुळे म्हाडा मालामाल! ८३ घरांच्या माध्यमातून मिळणार तब्बल ९६ कोटी रुपये

SCROLL FOR NEXT