sanjay raut-devendra fadnavis google
महाराष्ट्र बातम्या

Devendra Fadnavis : पवार साहेब बोलले ते सत्य आहे; बुलढाणा अपघातावरून राऊतांचा फडणवीसांना टोला

रोहित कणसे

नागपूरहून पुण्याकडे येत असलेल्या खाजगी बसचा समृद्धी महामर्गावर अपघात होऊन २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा शहराजवळ झालेल्या या भीषण बस अपघातानंतर पोलिसांनी चासक शेख दानीश यांच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीस अटक करण्यात आली आहे.

दरम्यान समृद्धी महामार्गावर सततच्या अपघातांवरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गाटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले की, एका बसमध्ये २६ लोकं ठार झाले म्हणून चालकावर गुन्हा दाखल केला, पण आतापर्यंत छोट्या कारमधून, स्वतःच्या वाहनांमधून लोकं जात होती त्यांचे अपघात झाले मग ते तुम्ही कोणावर गुन्हा दाखल करणार? मग हे सदोष मनुष्य वधाचे गुन्हे देवेंद्र फडणवीस स्वतःवरच दाखल करून घेत आहेत का? ते सुद्धा अपघातच आहेत ना. अनेक खाजगी वाहनांत कुटुंबासह लोक ठार झाले त्याची जबाबदारी कोण घेणार.

संपूर्ण समृद्धी महामार्गाची पुन्हा एकदा एक तांत्रिक चाचणी करावी, तसेच संपूर्ण महामार्गावर अपघाताच्या जागा कुठे आहेत? अपघात का होत आहेत? असा सवाल राऊतांनी विचारला आहे. गेल्या काही महिन्यात या महामार्गावर 300 पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत. शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत त्याच्यावरती त्यांनी बोलावं असेही राऊत यावेळी म्हणाले.

बसच्या अपघातात लोक ठार झाले यामुळे अख्या देशांमध्ये आहाकार झाला. पण साधारण १०० पेक्षा जास्त लोक आणि कुटुंब जेव्हा इतर मरण पावली त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे. मग या सरकारवरती समृद्ध महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

हे सराकर फक्त ठेकेदारांच्या माध्यामातून आपल्याकडे खोके यावेत यासाठी नवे प्रकल्प काढले जात आहेत. ठेकेदार सांगतील तशी कामे केली जात आहेत.समृद्धी महामार्गाचा गाडा घसरत गेला तो ठेकेदारांमुळे झालं. श्रेय घेण्याच्या लढाईमुळे अनेक गोष्टी घसरत गेल्या असेही संजय राऊत म्हणाले.

पवार काय म्हणाले होते

काल शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यूमुखी पडलेले लोकांसाठी देवेंद्रवासी झाली असे म्हटले होते. याबद्दल संजय राऊतांना विचारले असता, शरद पवार बोललेले आहेत. ते विचारपूर्वक बोलले असतील. त्याच्यावरती टीका-टिप्पणी करण्याची गरज नाही आणि पवार साहेब जे बोललेले आहेत ते सत्य आहे, असे राऊत म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rooh Afza Supreme Court verdict: सरबतचा मुद्दा थेट सुप्रीम कोर्टात! रुह अफझा प्रकरणात असा निर्णय, ज्याने कर गणितच बदललं…

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवडणूक १३ मार्च रोजी होण्याची शक्यता!

Narendra Modi Instagram Record : पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास, डोनाल्ड ट्रम्प सह जगातील सर्वच नेत्यांना मागे टाकत केला नवा विक्रम

Satara Politics: सातारा झेडपी अध्यक्षपदासाठी काऊंटडाऊन सुरू; शासनाकडून २० मार्चपर्यंत मुदत, सत्तेच्या कोंडीमुळे वाढली उत्सुकता!

Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT