MP Sanjay Raut Slam PM Modi BJP Govt over woman's Reservation bill and New parliament bill  
महाराष्ट्र बातम्या

'PM मोदींच्या तिथीनुसार वाढदिवसाचा मुहूर्त साधायचा होता, म्हणून...'; ठाकरे गटाची महिला आरक्षण विधेयकावरून सरकारवर टीका

रोहित कणसे

ऐतिहासिक महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर काल (२१ सप्टेंबर) राज्यसभेत देखील मंजूर झाला. यानंततर देशभरातून आनंद व्यक्त केला जात आहे. यादरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हिंदू तिथीनुसार वाढदिवस होता त्यांना तो मुहूर्त साधायचा होता म्हणून हे विधेयक आणल्याचे राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊत म्हणाले की, लोकसभा स्पेशल सेशन म्हणून हवा तयार करण्यात आली होती, पण विशेष अधिवेशनात भोपळा पण फुटला नाही. महिला विधेयक आलं, पण ते कधीही आणता आलं असतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हिंदू तिथीनुसार वाढदिवस होता त्यांना तो मुहूर्त साधायचा होता. जर महिलांना २०२४ साली आरक्षण द्यायचं नव्हतं. तर विशेष अधिवेशन बोलवलं कशाला? असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे.

2029 नंतर महिलांना हे आरक्षण मिळणार आहे. संसदेतील गॅलरीमध्ये दोन दिवसापासून RSS शी संबंधीत संस्थांमधील विद्यार्थी आणून मोदी जिंदाबाद आशा घोषणा द्यायला लावल्या यासाठी अधिवेशन बोलवलं? चंद्रायन वर या आधीही चर्चा देशभरात झाली आहे.मग या अधिवेशनात विशेष काय घडलं असा प्रश्नही संजय राऊत यांनी यावेळी केला.

नवीन संसद भवनात गोंधळाशिवाय काही नाही. सगळ्यांची इच्छा आहे परत आम्हाला जुन्या संसद भवनात जाऊ द्या. आतमध्ये गुदमरल्यासारखे होतंय... आतमध्ये हवा, पणी नाही. एखाद्या बँक्वेट हॉलमध्ये आल्यासारखं वाटतंय. एक ऐतिहासिक अशी वास्तू सोडून आपण फक्त कुणाच्या तरी हट्टापायी २० हजार कोटी रुपये खर्च करुन एक नवीन वास्तू बांधली. ती उपयुक्त नाही, हा पैशांचा अपव्यय आहे, असेही संदय राऊत म्हणाले.

फक्त काल तिथीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदीवस होता म्हणून तो मुहूर्त साधून महिला विधेयक त्यांना आणायचे होते आणि भाजपच्या कार्यालयासमोर त्यांना उत्सव साजरा करायचा होता. स्वतःवरती फुलं उधळून घ्यायची होती म्हणून हे सगळं केलं का अशा शंका लोकांच्या मनात आहेत असेही खासदार संजय राऊत म्हणाले. 2024 पर्यंत थांबा आणि त्यानंतर आमचा जल्लोष पाहा, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Doval: आपली मंदिरे लुटली, आपण गप्प पाहत राहिलो… आता इतिहासाचा ‘बदला’ घ्यायची वेळ; अजित डोवाल यांचा थेट इशारा

Woman Police Case : रक्षकच बनले भक्षक! महिला पोलिस कॉन्स्टेबलवर 8 वर्षे सामूहिक बलात्कार; पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावर सुरु होणार लाईट अँड साऊंड शो

महाराष्ट्रात MOFA आणि RERA चे वेगळे नियम; सरकारचा बांधकाम क्षेत्राला दिलासा, नवे नियम काय?

Chhatrapati Sambhajinagar Election : महापालिकेचे चौथे इलेक्शनही पाण्यावर! महापालिकेवर वाढले कर्ज; नागरिकांवर वाढीव पाणीपट्टीचे संकट

SCROLL FOR NEXT