Sanjay Raut attack on Narendra Modi Amit Shah esakal
महाराष्ट्र बातम्या

One Nation One Election : 'हे निवडणूका पुढे ढकलण्याचं षडयंत्र'; राऊतांचा 'वन नेशन, वन इलेक्शन'वरून केंद्रावर हल्लाबोल

रोहित कणसे

मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज (शुक्रवारी) दुसरा दिवस आहे. यादम्यान मोदी सरकारकडून एक देश एक निवडणूकीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान एक देश, एक निवडणूक हे षडयंत्र असल्याची टीका उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, देश तर एकच आहे, याबद्दल कुणाच्या मनात शंका आहे का? एक देश, एक निवडणूक ठीक आहे, पण त्याआझी निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात. फेअर इलेक्शन ही आमची घोषणा आहे. एक देश, एक निवडणूक नव्हे आम्हाला निष्पक्ष निवडणूका हव्या आहेत. देशात निष्पक्ष निवडणूका होत नाहीयेत.

निष्पक्ष निवडणुकीची आमची मागणी पुढे ढकलण्यासाठी त्यांनी (केंद्र सरकार) वन नेशन, वन इलेक्शन घेऊन आले आहे च. मला वाटतं की निवडणूका पुढे ढकलण्यासाठीचे हे एक षडयंत्र आहे, यांना निवडणूकाच घ्यायच्या नाहीयेत असेही संजय राऊत म्हणाले.

'इंडिया'ला घाबरलेले लोक दररोज नवीन काहीतरी घेऊन येत आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हे सुरू आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

यांनी केंद्र सरकार अधिवेशनाचे विशेष अधिवेशन बोलवलं आहे. याची काय गरज आहे. जेव्हा सत्र असते तेव्हा पंतप्रधान सभागृहात येत नाहीत. हा कोणता अमृतकाळ आहे. महाराष्ट्रासहित अनेक राज्यात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातले खासदार तेथे येऊ नयेत म्हणून हे करण्यात आलं आहे. हा छळ आणि कपट आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Super El Nino : भयंकर संकट! जगावर घोंघावतोय 'सुपर अल निनो'; नासाच्या उपग्रहाने टिपले धक्कादायक फोटो, 1997 सारखा विनाश होणार?

Shocking News : लग्नाची लगबग, दारात मांडव सजला, पण एक दिवस आधीच वधूसह अख्ख्या कुटुंबाने जीवन संपवलं; धक्कादायक घटनेने सर्वजण हादरले

Iran-Belgium FIFA: इराण-बेल्जियम गोलशून्य बरोबरी; गोलरक्षक अलिझेरा बैरानवंदची अप्रतिम कामगिरी

ठरलं तर मग फेम प्राजक्ता कुलकर्णीने सांगितला गोविंदासोबत काम करण्याची अनुभव, म्हणाल्या...'तो नेहमीच उशिरा येयचा'

Qatar LNG Plant Explosion : कतारच्या एलएनजी प्लँटमध्ये भीषण स्फोट; १२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, भारतीय दुतावासाकडून चिंता व्यक्त

SCROLL FOR NEXT