Udayanraje Bhosle esakal
महाराष्ट्र बातम्या

उदयनराजेंचा असाही दिलदारपणा! 'त्या' चिमुरडीकडून पुस्तकं खरेदी केली अन्..

सकाळ डिजिटल टीम

उदयनराजे भोसले हे नेहमी त्यांच्या हटकं स्टाईलसाठी ओळखले जातात; पण आज..

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) हे नेहमी त्यांच्या हटकं स्टाईलसाठी ओळखले जातात. कधी कॉलर उडवून तर कधी बाईक रपेट करत उदयनराजे चर्चेत असतात. मात्र, आता उदयनराजे एका वेगळ्याच प्रसंगामुळं चर्चेत आले आहेत. या प्रसंगामुळं उदयनराजेंनी सर्वांचीच मनं जिंकली आहेत. त्याचं झालं असं की, उदयनराजे आपल्या कारमधून प्रवास करत होते. यावेळी रस्त्यावर एक चिमुरडी पुस्तकं विकत उभी होती. या चिमुरडीनं उदयनराजेंच्या गाडीजवळ येत पुस्तकं खरेदी करण्याची विनंती केली.

दरम्यान, राजेंनीही दिलदारपणानं या चिमुकलीकडील सर्वच पुस्तकं विकत घेतली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. आपली हटके स्टाईल, बिनधास्त शैली आणि कॉलर उडवण्याची पद्धत, यामुळं खासदार उदयनराजे भोसले नेहमीच चर्चेत असतात. कधी ते सातारच्या (Satara) रस्त्यावर सुसाट गाडी चालवताना पाहायला मिळतात. तर कधी कार्यकर्त्याच्या दुचाकीवर फेरफटका मारतात.

मधल्या काळात त्यांना पुष्पा सिनेमानं भुरळ घातली होती. तर काल-परवा त्यांनी ‘चला हवा येऊ दे’च्या मंचावर थेट हवेतून एन्ट्री घेतली होती. आता उदयनराजेंनी आपला 'दिलदारपणा' पुन्हा एकदा सिध्द केलाय. साताऱ्यात ट्रफिक सिग्नलला अशी अनेक लहान मुलं आपल्या पोटापाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या गोष्टी विकत असल्याचं चित्र आहे. अशीच घटना उदयनराजेंच्या नजरेस पडली अन् त्यांनी या चिमुकलीकडील सर्वच पुस्तकं विकत घेतली. त्यांच्या या कृतीचं सर्वच स्तरातून कौतुक आहे, तर काहींनी अशा मुलींना मदत करण्याची अपेक्षा व्यक्त केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT