Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

पानपट्टीवरील बिडी मिळते, तशी ईडीची अवस्था झालीय : उदयनराजे

सकाळ डिजिटल टीम

या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या, मी दाखवतो या सगळ्यांना, असा इशारा उदयनराजेंनी दिलाय.

सातारा : सध्या राज्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकीय घडामोडींवर खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिलीय. सध्याचे राजकीय वातावरण कुणी बिघडवले याचा विचार केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. माझं आवडतं चॅनेल टॉम अॅण्ड जेरी (Tom and Jerry) आहे. पण, सध्या मी ते बघायचं बंद केलंय आणि ज्या माकड उड्या चालल्या आहेत, त्या बघत बसतोय. कोण कुणाला मारतंय, कोण कुणाला आत टाकतंय हे बघतोय, अशा शब्दात उदयनराजेंनी निशाणा साधलाय.

दरम्यान, बेधडक आणि रोखठोक विधानांनी नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेणारे खासदार उदयराजेंनी आता थेट सक्तवसुली संचालनालयाची (ED) सुत्रंच आपल्या हाती देण्याची मागणी केलीय. "या लोकांनी पैसे खाल्लेच आहेत. माझ्या हातात ईडी द्या, मी दाखवतो या सगळ्यांना. सारखे-सारखे ईडी म्हणजे काय चेष्टा झालीय. पानपट्टीवरील बिडी मिळते ना तशी ईडीची अवस्था झालीय. या सर्वांना ताब्यात घ्या आणि चाप लावा सगळे सरळ होतील. दांडक्याने सडकून काढलं पाहिजेत", असं रोखठोक विधान उदयनराजेंनी केलंय.

उदयनराजे पुढं म्हणाले, एका बाजूला फुटपाथवर लोक झोपत आहेत, या लोकांना दिसत नाही का? प्रत्येकाने एकमेकांची पाठ थोपटायची, जेलमध्ये आहे तरी त्याने काही केले नाही. दीड वर्ष, दोन वर्ष जेलमध्ये पण त्याने काही केले नाही म्हणायचे. लोकांना डोळे नाही, लोकांना मेंदू नाही, लोक हसतायत, असं ते म्हणाले. जर निवडणुका लागल्या तर हे कसे उभारणार हे त्यांचे त्यांनाच माहिती, असंही ते म्हणाले. माझं नाव घ्यायचं नाही, मी कुणाच्या नादाला लागत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT