Udayanraje Bhosale esakal
महाराष्ट्र बातम्या

Shiv Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल..; काय म्हणाले उदयनराजे?

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज (19 फेब्रुवारी) सर्वत्र साजरी होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत.

Shivaji Maharaj Jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज (19 फेब्रुवारी) सर्वत्र साजरी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची यंदा 393 वी जयंती आहे.

तसंच, यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य रक्षणासाठी उभारलेले गड-किल्ले जगभरातील पर्यटनप्रेमींचं मुख्य आकर्षण आहे. शिवाजी महाराजांमुळं महाराष्ट्राची ओळख जगभरात पोहोचलीये.

आज याच पार्श्वभूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी ट्विटव्दारे महाराजांना जयंतीदिनी अभिवादन केलंय. छत्रपती शिवराय म्हणजे, मातृभूमीला लाभलेलं एक बहुमूल्य वरदान आहे. महाराजांनी पेटवलेली क्रांतीची मशाल पिढ्यानपिढ्या पुढं सरसावत आहे एखाद्या झंझावाताप्रमाणं.. म्हणूनच, छत्रपती शिवाजी महाराज आजही सर्वांच्या श्वासात, मनात, हृदयात, जगण्यात वसतात असं उदयनराजेंनी म्हटलंय.

शून्यातून स्वराज्य उभारुन नवा इतिहास रचणाऱ्या शिवरायांनी दाखवून दिलेल्या मार्गावरुन चालण्याचा निश्चय करुयात, असं सांगत त्यांनी संपूर्ण देशवासियांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीविषयी अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवजयंतीच्या दिवशी सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या दिवशी किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT