Vinayak Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्री शिंदे हे एकमेव अडाणी मंत्री - विनायक राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना अटक झाल्यानंतर शिवसेनेतील विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे हे राज्यातील एकमेव अडाणी मंत्री आहेत, त्यांच्या शिक्षणाचा पत्ता नाही अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

(Vinayak Raut On CM Shinde)

पुण्यातील एका उद्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव दिलं होतं. त्यानंतर त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री जाणार होते पण नावावरून वाद निर्माण झाल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला असून त्यानंतर विनायक राऊतांनी हे वक्तव्य केलं आहे. "गुडघ्याला बाशिंग बांधून फिरणारे एकनाथ शिंदे हे आहेत. त्यांना शिक्षणाचा पत्ता नाही तर प्रशासन कसं चालवायचं याचं भान नाही. महाराष्ट्रातील एकमेव अडाणी मंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख इतिहासात होईल." असं राऊत म्हणाले.

"ज्या उद्यानाला शिंदे यांचं नाव द्यायचं होतं, त्या उद्यानाचा प्रस्ताव पुणे महापालिकेने मंजूरच केला नाही पण फक्त एकनाथ शिंदे यांचं नाव येतय म्हणून उद्घाटनाला जाणे यापेक्षा जास्त अडाणीपणा कोणता असू शकतो." अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांचा समाचार त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, शिंदे हे अडाणी आहे, की काय हे त्यांना लवकरच कळेल. आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पण कित्येक लोकं आमच्यासोबत येत आहेत. त्यांना वाटतं आम्ही महाराष्ट्रात दौरे केले म्हणजे लोकं आम्हाला डोक्यावर घेतील पण ते डोक्यावर घेतील की दुसरं कुठं घेतील हे त्यांना माहिती नाही असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT