MPSC exam answer key  Sakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC परिक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात पहिला

विशेष म्हणजे मुलाखती संपल्यानंतर अवघ्या दोन तासात राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० चा निकाल जाहीर करण्यात आला असून, प्रमोद चौगुले हा राज्यात प्रथम आला आहे. तर, निलेश कदम दुसरा तर, रुपली माने हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे मुलाखती संपल्यानंतर अवघ्या दोन तासात राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात प्रमोद बाळासाहेब चौगुले ६१२.५० गुण संपादन करीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर नीतेश नेताजी कदम ५९१.२५ गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात तिसरी आणि महिलांमध्ये पहिला येण्याचा मान रूपाली गणपत माने हीने ५८०.२५ गुणांवर मिळविला आहे.

आयोगाने ५९७ उमेदवारांची गुणवत्ता यादी घोषित केली आहे. आजवरच्या आयोगाच्या इतिहासातील हा पहिला जलद गतीने लागलेला निर्णय आहे. ज्यामध्ये मुलाखती पार पडल्या त्याच दिवशी अवघ्या दोन तासात अंतिम निकाल जाहीर केला आहे. आयोगाने आपल्या कार्यपद्धतीत केलेल्या बदलाचा हा परिणाम आहे. मागील महिन्यातही ज्या परीक्षांच्या मुलाखती झाल्या. त्याच दिवशी त्यांचे निकाल घोषित करण्यात आले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सातत्याने टीका करण्यात येत होती. एवढेच नव्हे तर, आयोगाकडून दिलेल्या वेळेत परिक्षा घेतल्या जात नाहीत. तसेच परिक्षा गेतल्यास त्याचा निकाल लावला जात नाही अशा प्रकारच्या टीका लोकसेवा आयोगावर आणि राज्य सरकारवरदेखील केल्या जात होत्या. त्यानंतर आपली कार्यशैली बदलण्यावर आणि ते गतीमान करण्याचं आव्हान आयोगासमोर होतं. त्यानंतर आज मुलाखतींच्या अवघ्या दोन तासांनंतर कामाची शैली बदलली असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालानंतर दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja Visarjan 2026 : लालबागच्या राजाच्या विसर्जनाला यंदाही होणार विलंब? गिरगाव चौपाटीवरील 'त्या' नैसर्गिक कारणामुळे वाढली चिंता; प्रशासनासमोर मोठं आव्हान

‘आईला सोडून कसा जाऊ? आधी तिला बाहेर काढतो’... शेवटपर्यंत झुंजला, अखेर बस आगीत माय-लेकाचा मृत्यू; अंगठीवरून पटली ओळख

‘तुम्हाला काय प्रॉब्लेम?’ सततच्या चर्चांवर गोविंदांचा सवाल; म्हणाला...‘माझ्या खासगी आयुष्याचा तमाशा करू नका’

Latest Marathi News Live Update : मुंबईत विसर्जन मिरवणुकीत दुर्घटना; प्रभादेवीत भरधाव कार थेट गर्दीत घुसली, चार जणांना दुखापत

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

SCROLL FOR NEXT