MPSC big decision is to allow students to change examination center 
महाराष्ट्र बातम्या

एमपीएससी'चा मोठा निर्णय! 'या' विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी पुणे जिल्हा निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या महसुली ठिकाणी परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. 17 ऑगस्ट च्या दुपारी दोन वाजल्यापासून 19 ऑगस्टच्या रात्री 23.59 वाजेपर्यंत उमेदवारांना केंद्र बदलता येणार आहेत.

पुणे जिल्हा निवडलेल्या उमेदवारांपैकी पुणे महसुली विभागात बाहेरील मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या उमेदवारांना त्यांच्या महसूली विभागातील परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. तर पुणे महसूली विभागातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यास मुभा असणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान महसुली परीक्षा केंद्र बदलण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना आयोगामार्फत एसएमएस केले जाणार आहेत.

ठळक बाबी...

  • - 17 ऑगस्ट दुपारी दोन ते 19 ऑगस्ट सायंकाळी बारा वाजेपर्यंत बदलता येणार परीक्षा केंद्र
  • - जिल्हा केंद्र निवडण्यासाठी असलेल्या पात्र उमेदवारांना आयोगामार्फत एसएमएस द्वारे कळविले जाणार
  • - प्रत्येक महसूल विभागाच्या मुख्यालयातील जिल्हा केंद्रांची कमाल क्षमता लक्षात घेऊन प्रथम येणाऱ्यास राहणार प्राधान्य
  • - परीक्षा केंद्राची क्षमता संपल्यानंतर केंद्राची निवड उमेदवारांना करता येणार नसल्याचे आयोगाकडून स्पष्टीकरण


उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

राज्यातील जवळपास अडीच लाख विद्यार्थी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा 20 सप्टेंबर रोजी देणार आहेत. परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येणे उमेदवारांना कठीण होणार आहे. ही अडचण लक्षात घेऊन आयोगाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी दिली आहे.
- सुनिल आवताडे, सहसचिव, एमपीएससी 

संपादन : अशोक मुरुमकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT