MPSC Exam esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; MPSCची कमाल संधीची मर्यादा रद्द

यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांसाठी उमेदवारांच्या प्रयत्नांच्या मर्यादित संख्येचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना आता वयाच्या अधीन राहून परिक्षा देता येणार आहेत.

(MPSC Exam Attempts Limit Cancelled)

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० डिसेंबर २०२० आणि २७ ऑक्टोबर २०२१ ला केलेल्या घोषणेमध्ये उमेदवारांना परिक्षा देण्यासाठी प्रयत्नांसाठी मर्यादा घातली होती पण ती मर्यादा आता रद्द करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

दरम्यान उमेदवारांना संधीच्या अटीची मर्यादा नसली तरी त्यांना वयाची अट लागू असणार आहे. ज्या त्या प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या नियमांच्या अधीन राहून कितीही वेळा परिक्षा देण्याची संधी मिळणार आहेत. या संदर्भातील घोषणा आयोगाने केली आहे.

UPSC ने लागू केलेल्या संधीच्या नियमानुसार MPSCने सुद्धा परिक्षा देण्यासाठी संधीची अट घालण्यात आली होती. त्यानूसार खुल्या प्रवर्गासाठी सहा तर इतर मागासवर्गीयांसाठी नऊ संधी देण्यात आल्या होत्या. तर अनुसूचीत जाती आणि अनुसूचित जमातीसाठी मर्यादा नव्हती. पण आता हा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागे घेतला असून वयाच्या अटी पाळून उमेदवारांना आता कितीही वेळा परिक्षा देता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Live Update: ट्रेनसमोर उडी मारल्याने एका प्रवाशाचा मृत्यू

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

Maharashtra Tourism : जागतिक पर्यटन नकाशावर महाराष्ट्राचा ठसा उमटवण्यासाठी डिजिटल ब्रँडिंग व आधुनिक मार्केटिंगला पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचा भर

World Hepatitis Day 2026: लक्षणं नसतानाही हिपॅटायटिसचा धोका कोणाला असू शकतो? वाचा तज्ज्ञ काय सांगतात...

SCROLL FOR NEXT