nana_patole 
महाराष्ट्र बातम्या

MPSC परीक्षेबाबत लवकरच तोडगा काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन - नाना पटोले

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : MPSC परीक्षेबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपलं फोनवरुन बोलणं झाल्याचं त्यांनी ट्विट करुन सांगितलं आहे. 

पटोले म्हणाले, "आत्ताच MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझं फोनवरुन बोलणं झालं असून मुख्यमंत्र्यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे." 

तत्पूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची अडचण सांगताना पटोलेंनी मागणी केली की, "अनेक संकटांना मात करत विद्यार्थी परीक्षांकरता परिश्रम घेत असतो. दरम्यान, जवळ आलेली MPSC ची परीक्षा झाली पाहिजे कारण विद्यार्थांचं भविष्य यावर अवलंबून आहे. कोरोनाचे संपूर्ण नियमांचे पालन करत विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याकरीता ही परीक्षा झाली पाहिजे ही आमची रास्त मागणी आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराविरोधात बलूच मुलीची थेट भारताला साद; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Dapoli Tourism: सलग सुट्ट्यांचा फायदा; दापोली किनारपट्टीवर पर्यटकांची तुफान गर्दी, हर्णै मासळी बाजारातही उत्साह

Khamgaon Krushi Bazar Samiti: खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस ११ लाखांचा हातभार

NEET 2027: पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेत होणार 'हे' बदल! वर्षातून अनेकवेळा परीक्षा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT