Corona-Test 
महाराष्ट्र बातम्या

MPSC परीक्षेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) रविवारी होणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे म्हणाल्या, जिल्ह्यात ७७ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, या परीक्षेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सुमारे ३१ हजार उमेदवार असतील. केंद्रांवर नेमलेल्या सुमारे दोन हजार सातशे कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात येत आहेत.

महापालिकेच्या केंद्रांवर या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुमारे बाराशे कर्मचाऱ्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या चाचण्या शनिवारी दुपारपर्यंत पूर्ण करण्यात येतील. प्रत्येक परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासून सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरटीपीसीआर चाचणीत काही कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यास अडचण येऊ नये, यासाठी राखीव कर्मचारी नेमण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर २० ते ३० कर्मचारी असतील. संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची केंद्रप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गात बैठक व्यवस्था नेहमीप्रमाणे असेल. त्यानुसार एका वर्गात कमीत कमी १२ आणि जास्तीत जास्त २४ उमेदवार असतील, असे डॉ. कटारे यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT