MPSC Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यभरात परीक्षा सुरळीत; लोकसेवा आयोगाचा दावा

परीक्षेला नोंदणी केलेल्या २ लाख ५२ हजार ३९५ पैकी ६५ ते ७० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली असल्याचे समोर आले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाकडून राज्यभरात घेण्यात आलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा सर्व परीक्षा केंद्रावर सुरळीत पडली, यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचा दावा आयोगाने केला आहे.

आयोगाकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा ही राज्यातील एकूण ७२४ परीक्षा उपकेंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेला नोंदणी केलेल्या २ लाख ५२ हजार ३९५ पैकी ६५ ते ७० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली असल्याचे समोर आले. तर आयोगाच्या या परीक्षेचा पेपर फुटल्यासंदर्भात काही समाजमाध्यमामध्ये बातम्या आल्या, त्यावर आयोगाने ट्विट करून खुलासा केला. त्यात त्यांनी अशी कोणतीही घटना घडलेली नाही असे स्पष्टीकरण दिले.तसेच अशाप्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज्य सेवा पूर्व परीक्षा सुरळीतपणे पार पडल्याचे आयोगाने ट्विट करुन माहिती दिली.

कोरोनामुळे ही परीक्षा गतवर्षी झालेली नाही. यंदा २ जानेवारी २०२२ रोजी होणार होती. मात्र त्यालाही पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. कोरोना काळात शासकीय सेवांमधील भरतीसाठी परीक्षा न झाल्यामुळे अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळावी म्हणून परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.

कोरोनामुळे मागील वर्षी ज्या उमेदवारांचे परीक्षेसाठी वयोमर्यादा संपली होती, त्यांना एक संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. वाढीव वयोमर्यादेनुसार, जे उमेदवार परीक्षा देण्यासाठी पात्र ठरले आहेत आणि त्यांनी अर्ज भरलेला नाही अशांना सामावून घेण्यासाठी ही परीक्षा पुढे ढकलली होती.

रविवारी झालेली ही परिस्थिती क्षा पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी , तहसीलदार अशा ३९० पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा असल्याने राज्यभरातून मोठ्या संख्येने या परीक्षेसाठी अर्ज आले होते.

रविवारी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा चालू असतानाच नागपूरच्या क्रीडा चौकातील साऊथ पॉईंट स्कूलमध्ये सकाळी परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिकेचा सीलबंद लिफाफा फोडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला. त्यांनतर या परीक्षा केंद्रावर हे आंदोलन करत बसले. राज्यात आज एमपीएससीचा पेपर झाला. अशाप्रकारचा कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती आयोगाने देत स्पष्टीकरण देत ही परीक्षा सुरळीत झाली असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT