mpsc exam 
महाराष्ट्र बातम्या

MPSC Exam : PSI-STI-Assistant मुख्य परीक्षा ढकलल्या पुढे; जाणून घ्या कारण

यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. प्रशासकीय कारणामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं MPSCनं स्पष्ट केलं आहे. (MPSC Exam Group B Main Exam 2022 Postponed need to know what is the reason)

महाराष्ट्र दुय्यम सेवेअंतर्गत येणाऱ्या संयुक्त पेपर क्रमांक १, संयुक्त पेपर क्रमांक २ (पोलीस उपनिरीक्षक), संयुक्त पेपर क्रमांक २ ( राज्य कर निरीक्षक) तर पेपर क्रमांक २ (सहाय्यक कक्ष अधिकारी) आणि दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक या मुख्य परीक्षा २०२२ पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यांपैकी पेपर १ ची परीक्षा २४ डिसेंबर २०२२, पोलीस उपनिरीक्षकाची (PSI) ३१ डिसेंबर, राज्य कर निरीक्षक (STI), सहाय्यक कक्ष अधिकारी (Assistant) १४ जानेवारी २०२३ रोजी या परीक्षा होणार होत्या.

काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

दरम्यान, या सर्व परीक्षांच्या नव्या तारखा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Threat : एका रात्रीत इराणला नष्ट करु, ती रात्र कदाचित आजची असेल... डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर इशारा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 07 एप्रिल 2026

अग्रलेख : ...आमचा शिक्षणाचा धंदा!

झोपेची पद्धत आणि कणा

ढिंग टांग : होर्मुझ : काही सोपे तोडगे..!

SCROLL FOR NEXT