rohit pawar satyajeet tambe 
महाराष्ट्र बातम्या

'एमपीएससी'वरून, रोहित पवार, सत्यजित तांबेंचा सरकारला घरचा आहेर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय़ चुकीचा असल्याचं सांगतं आता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनीच आता घरचा आहेर दिला आहे. 14 मार्चला होणारी एमपीएससीची परीक्षा अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यात नवी पेठेत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी एकत्र येत गर्दी केली असून परीक्षा 14 मार्चलाच घेण्यात यावी अशी मागणी करत त्यांनी ठिय्या मांडला आहे. 

एमपीएससीच्या या निर्णयावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सत्यजित तांबे यांनी म्हटलं की, एमपीएससी मंडळानं, असा निर्णय घेणं चुकीचं आहे. या निर्णयाचा निषेध करतो. महिनोन महिने अभ्यास केलेला असतो. माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा.

कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही परीक्षा नियोजित वेळेनुसार घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून म्हटलं की, यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच एमपीएससीची ची परीक्षाही झाली पाहिजे.

एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या या मागणीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष द्यावं असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

माजी आमदार पंकजा मुंडे यांनीही महाविकास आघाडी सरकारने घेतेला हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत #MPSC रविवार दिनांक 14 मार्च, 2021 रोजी नियोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 ही अचानक पुढे ढकलण्यात आली आहे, हा चुकीचा निर्णय घेतला गेला आहे, त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान होणार असल्याने  त्यावर नाराजी व्यक्त करत आहे असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asim Sarode: असीम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द; 'हे' वादग्रस्त विधान भोवलं

World Cup 2025: ...अन् हरमनप्रीत कौर कोच अमोल मुजूमदारला पाहताच पडली पाया; विश्वविजयानंतरचा भावूक करणारा क्षण

Priyanka Gandhi: हवाप्रदूषण कमी करण्यासाठी एकत्र काम करू; खासदार प्रियांका गांधी वद्रा यांचे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवाहन

Latest Marathi News Live Update : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्याबाहेर सुषमा अंधारेंकडून ठिय्या

मित्रांसोबत दारू प्यायला जाताय? मग पुष्कर श्रोत्रीने सांगितलेले 'हे' चार नियम नक्की पाळा, म्हणतो- माझे वडील म्हणाले...

SCROLL FOR NEXT