mla satyajeet tambe set up in nashik yuva mahiti kendra politics esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC Exam: एकाच दिवशी तीन परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप ; परीक्षांच्या तारखा बदला ! आमदार सत्यजीत तांबेंची मागणी

सकाळ डिजिटल टीम

MPSC Exam: एमपीएससीची उपनिरीक्षक पदासाठीची, नगरपरिषद भरती आणि ‘महाज्योती’तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा या तीनही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.यामुळे राज्य लोकसेवा आयोगाने आपल्या अखत्यारितल्या परीक्षांची तारीख बदलावी, अशी मागणी आ. सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

२९ ऑक्टोबर रोजी राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची उपनिरीक्षक पदासाठीची परीक्षा आहे. याच दिवशी नगर परिषद भरती परीक्षाही आयोजित करण्यात आली आहे. तसंच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे घेतली जाणारी प्रवेश परीक्षाही याच दिवशी होणार आहे.

राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण-तरुणी एकाच वेळी विविध परीक्षांसाठी अर्ज करत असतात. मात्र या तीनही परीक्षा एकाच दिवशी आल्याने एकाच वेळी या तीन परीक्षा कशा देणार ? असा सवाल त्यांनी विचारला.

ज्यभरात पेपरफुटीचा मोठा घोळ सुरू असतानाच एकीकडे तिन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जात असतील. तर हा परीक्षार्थींचा मोठा अपमान आहे. उमेदवारांनी परीक्षेची तयारी कशी करावी? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडत आहे. सध्या देशात बेरोजगारांची संख्या वाढत आहे. जर अशा पद्धतीने परीक्षांमध्ये घोळ सुरू राहिले, तर नवीन बेरोजगारांची वाढ होऊ शकते. याकडे शासनाने काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. तसेच तरुणांचे भवितव्य उज्ज्वल बनविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

– आ. सत्यजीत तांबे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT