MPSC result Group C Service Joint Prelims Exam Result 2022 Declared know how to Check result  esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC Updates : मुलाखतीच्या सुधारित तारखा जाहीर; आयोगाने प्रसिद्ध केलं वेळापत्रक

MPSC चे विद्यार्थी पुन्हा एकदा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयोगाने आपल्या ट्वीटर हँडलवरुन तसंच संकेतस्थळावरुनही हे वेळापत्रक शेअर केलं आहे. दरम्यान, पुण्यामध्ये आज पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी MPSCचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ साठीच्या मुलाखती नियोजित केल्या आहेत. मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या २३ आणि २४ फेब्रुवारी २०२३ रोजी पुण्यात मुलाखती घेण्यात येणार होत्या मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे.

२८ फेब्रुवारी रोजी मुंबईत या मुलाखती होणार आहेत. यासाठी आयोगाने परीक्षा क्रमांकानुसार वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुंबईतल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्य़ा कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील.

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात एमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पहिल्या टप्प्यात ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा’ या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलने केली तर यानंतर एमपीएससी आयोगाने जाहिर केल्याप्रमाणे बदल हा २०२३ पासूनच लागू करावा या साठाही विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. आता आज पुन्हा ‘राज्यसेवा मुख्य नवीन पॅटर्न २०२५ पासून लागू करावा’ या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज पुन्हा पुण्यामध्ये आंदोलन केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ'ची दादागिरी संपणार? पुतीन यांची भारताला मोठी ऑफर! दोन्ही देशांना सापडला नवा व्यापारी मार्ग

Charas Seized : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कोटींचे चरस जप्त; बँकॉकहून आलेल्या महिला प्रवाशाकडून कॉस्मेटिकच्या डब्यांतून तस्करी

Lohgaon News : लोहगाव अत्याचार प्रकरण; आरोपीला कठोर शिक्षेची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी

Nagpur Crime : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून; आरोपीला अटक, दोन महिन्यांपूर्वी आला होता कारागृहातून सुटून

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

SCROLL FOR NEXT