MPSC Recruitment 2022
MPSC Recruitment 2022 esakal
महाराष्ट्र

MPSC Recruitment : स्वच्छता, पाणी पुरवठा विभागात पदभरती; वाचा सविस्तर

संतोष कानडे

मुंबईः पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामध्ये वर्ग -१ पदासाठी जागा निघालेल्या आहेत. यासंबंधची जाहिरात आज प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंबंधिती माहिती दिली आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट-अ संवर्गाच्या 12 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.110/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे.

यासह शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील उप अभियंता (यांत्रिकी), भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट-अ संवर्गाच्या 26 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.109/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे.

हेही वाचाः ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

तसेच पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागातील सह संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गट-अ संवर्गाच्या 01 पदाच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.108/2022) प्रसिध्द करण्यात आली आहे.

सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2022 (जा.क्र. 086/2022) ची प्रथम उत्तरतालिका व त्याबाबतची घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT