MPSC Exam esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC तर्फे घेण्यात आलेल्या PSI, STI पदांच्या पूर्व परीक्षांचा निकाल जाहीर

Sandip Kapde

MPSC Result  : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ करिता दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/मुद्रांक निरीक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून दुय्यम निबंधक (श्रेणी- १) / मुद्रांक निरीक्षक (मुख्य) परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल ६ जुलै, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा – २०२२ राज्य कर निरीक्षक संवर्गाचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता राज्य कर निरिक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून राज्य कर निरिक्षक (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल आज ६ जुलै, २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित, मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार ८ ऑक्टोबर २०२२ रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता पोलीस उपनिरिक्षक संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून पोलीस उपनिरीक्षक (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल ५ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परिक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ८ ऑक्टोबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ करिता सहायक कक्ष अधिकारी संवर्गासाठी विकल्प दिलेल्या उमेदवारांमधून सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल दिनांक ५ जुलै २०२३ रोजी जाहीर करण्यात आला आहे.

मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत, विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परिक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच, पूर्वपरिक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परिक्षेकरिता स्वीकारार्ह ठरतील, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजेला सुरुवात

मोदी सरकारचा एक निर्णय, 2 पालखी मार्गांसाठी मिळाले 12 हजार 41 कोटी! 365 किमी मार्गांमुळे पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन सुलभ; पालखी मार्गांची वैशिष्ट्ये काय? वाचा...

Sonam Wangchuk: सोनम वांगचुकांनी उपोषण का सोडलं? नवीन व्हिडिओतून थेट कारणच सांगितलं; म्हणाले- अशा देशावर धिक्कार...

SCROLL FOR NEXT