MPSC Result esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC Result : कृषी सेवा परिक्षेचा निकाल जाहीर; आयोगाने दिली महत्त्वाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या कृषी सेवा मुख्य परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.

या निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखतीस बोलावण्यात येत आहे. उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबाईल नंबरवर आणि मेसेजद्वारे मुलाखतीस बोलावण्यात येणार आहे.

हेही वाचाः जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

ज्या उमेदवारांना गुणांची फेरपडताळणी करायची आहे, त्यांनी गुणपत्रक प्रोफाईलमध्ये प्राप्त झाल्यापासून दहा दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.

मुलाखतीमध्ये सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

दरम्यान, २७ डिसेंबर रोजी लोकसेवा आयोगाने जाहिरात काढून खालील पदांची भरती जाहीर केली आहे.

  • महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र राज्य विमा सेवा, गट-ब संवर्गाची 15 पदे

  • कान, नाक घसा तज्ञ (Senior E.N.T. Surgeon) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 2 पदे

  • मनोविकार तज्ञ (Senior Psychiatrist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाचे 1 पद

  • शरीरविकृती शास्त्रज्ञ (Senior Pathologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 3 पदे

  • बधिरीकरण शास्त्रज्ञ (Senior Anesthetist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे

  • क्ष-किरण शास्त्रज्ञ (Senior Radiologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 3 पदे

  • नेत्ररोग तज्ञ, (Senior Ophthalmologist) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे

  • बालरोग तज्ञ (Senior Paediatrician) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे

  • स्त्रीरोग व प्रसुती शास्त्रज्ञ (Senior Obstetrician and Gynaecologist)विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 7 पदे

  • अस्थिव्यंग शल्यचिकित्सक (Senior Orthopaedic Surgeon), विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाची 5 पदे

  • शल्यचिकित्सक (Senior Surgeon) विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाच्या 8 पदे

  • भिषक (Senior Physician), विशेषज्ञ, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ संवर्गाच्या 8 पदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT