MPSC results and schedule should be announced Youth Congress demands to CM 
महाराष्ट्र बातम्या

राज्यसेवेचे निकाल व वेळापत्रक जाहीर करावे; युवक काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यसेवेच्या गत वर्षी झालेल्या परीक्षेचे अद्याप न लागलेले निकाल व तसेच आगामी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. बालाजी गाढे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना अर्थात COVID-19 च्या प्रभावामुळे देशभरात टाळेबंदी लागू केलेली आहे, त्यामुळे सर्वच क्षेत्रे सध्या ठप्प आहेत, पण हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यभरात प्रशासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा मोठा विद्यार्थीवर्ग आहे. यात बहुतकरून ग्रामीण भागातील विद्यर्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
----------
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना कोरोना
----------
दिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांचा केजरीवालांना दणका
----------
केंद्र सरकारचा नवा उपक्रम; आता घरोघरी होणार तपासणी
----------
राज्यशासनाने गत वर्षी घेतलेल्या स्पर्धा परीक्षांचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. विद्यार्थी त्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक अडचणी व बिकट आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत हे विद्यार्थी परीक्षांची तयारी करत असतात, त्यामुळे सहाजिकच त्यांना निकालाची उत्सुकता असते. नेमकी हीच बाब ध्यानी घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक बालाजी गाढे पाटील यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच, आगामी राज्यसेवा परीक्षांचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे जेणेकरून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याही मागणीचा उल्लेख त्यांनी सदर निवेदनात केला आहे. थेट मुख्यमंत्र्यांना दिलेल्या या निवेदनाचा राज्यसरकार विचार करेल आणि तात्काळ योग्य ते निर्णय घेतले जातील ही अपेक्षा असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT