Results of eligible candidates for the main examination of Sub-Inspector of Police announced Results of eligible candidates for the main examination of Sub-Inspector of Police announced
महाराष्ट्र बातम्या

पोलिस उपनिरीक्षकाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल जाहीर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवारी (ता. १६ एप्रिल २०२२) पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पूर्व परीक्षा २०२१ मधून मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निकाल गुरुवारी (ता. ९) जाहीर करण्यात आला आहे. प्रस्तुत पदासाठी पूर्व परीक्षेत अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावाची यादी व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Results of eligible candidates for the main examination of Sub-Inspector of Police announced)

प्रस्तुत पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जातील माहितीच्या आधारे पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या (Exam) निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मुख्य परीक्षेसाठी विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या तसेच परीक्षा शुल्क भरणाऱ्या अर्हताप्राप्त उमेदवारांनाच मुख्य परीक्षेस प्रवेश देण्यात येईल.

आवश्यक तपासणीनुसार अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी आयोगाकडून कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल. या पदाची मुख्य परीक्षा ३ जुलै रोजी नियोजित होती. मात्र, परीक्षेची सुधारित दिनांक प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहिरात विभागाकडून आयोगाच्या संकेतस्थळावर (MPSC) स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. परीक्षेचा निकाल मा. न्यायालयात/मा. न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून प्रसिद्ध केला आहे.

पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेजद्वारे कळविण्यात येईल. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने आवश्यक माहिती तसेच परीक्षा शुल्क विहित मुदतीत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक राहील. त्याशिवाय उमेदवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येणार नाही. तसेच पूर्व परीक्षेसाठी सादर केलेल्या अर्जातील दावेच मुख्य परीक्षेकरीता स्वीकारार्ह ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Highway Traffic : ठाणे-मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी मोठी बातमी! महामार्ग पोलिसांकडून 'या' दिवशी अवजड वाहनांना प्रवेशबंदी, प्रवासाच्या नियोजनापूर्वी वाचा ही अपडेट

Central Railway: खोपोलीकरांसाठी लोकलला 'ब्रेक'! पळसदरी-खोपोलीदरम्यान दोन महिने विशेष ब्लॉक, पाहा वेळापत्रक

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : पहलगाम दहशतवादी हल्ला प्रकरणी आरोपी सैफुल्ला उर्फ ​​साजिद जट्ट याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Raigad Teacher Recruitment: रायगड ZP शिक्षक भरतीत सहा तालुके पूर्णपणे वगळले; शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अधिक गंभीर

SCROLL FOR NEXT