MPSC Students Protest in Pune esakal
महाराष्ट्र बातम्या

MPSC Students Protest : पुण्यात MPSC करणारे विद्यार्थी रस्त्यावर; काय आहेत मागण्या?

सकाळ डिजिटल टीम

MPSC Students Protest in Pune

पुणेः विविध मागण्यांसाठी आज पुण्यामध्ये एमपीएससी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुण्याती नवी पेठेत हे आंदोलन सुरु असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे.

काय आहेत मागण्या?

राज्यसेवा पूर्व 2023 ही 4 जून रोजी आहे. त्यात लाखो विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असल्याने पूर्व परीक्षा पास होणे आव्हानात्मक असते. म्हणून पूर्वचा किमान 5-6 महिने अभ्यास गरजेचा असल्याने वेळ मिळावा.

Syllabus जसाच्या तसा UPSC चा Copy Paste आहे. MPSC च्या मुलांना अजून संदर्भसाहित्यच उपलब्ध नाही. त्यात सुधारणा व्हावी.

हेही वाचाः ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

जुन्या 5000 मुलाखती रखडल्या आहेत. राज्यसेवा 2022 ची तर मुख्यही झालेली नाही, त्यांच्या मुलाखती व्हायला April- May महिना यायचा मग त्यांनी अभ्यास कधी आणि कशातून करायचा असाही प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे.

पुण्यातील नवी पेठेत विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. वर्णनात्मक परीक्षेला आमचा विरोध नाही, फक्त त्यासाठी तयारी करायला पुरेसा वेळ आणि स्पर्धा समान पातळीवर असावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

नवीन पॅटर्न 2025 ला लागू केला तर जुन्या पद्धतीने अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना शेवटच्या 2 संधी मिळतील. ज्यांना नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची आहे, ते 2025 साठी तयारी करतील परंतु पॅटर्न लागू करण्याची घाई झाली तर मात्र बहुतांश विद्यार्थ्यांचे नुकसान आहे. यासंदर्भात शासनाने विचार करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT