एमपीएसी विद्यर्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासूनच सुरु होणार आहे. (MPSC Students Shinde government took a big decision Cm Eknath Shinde Devendra Fadnavis )
एमपीएससीचा नवा पॅटर्न २०२५ पासूनच लागू करण्यात येणार आहे. एमपीएससीचे नवे नियम 2025 पासून लागू होणार.
मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर इतरही मंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना अवगत केले आणि हे नियम 2025 पासून लागू करण्याची विनंती केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.
एमपीएसी परीक्षा पध्दतीत आयोगाकडून करण्यात आलेले बदल हे २०२३ एवजी २०२५ पासून लागू करावेत या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन केलं होत. पुण्यातील अल्का टॉकिज चौकात MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अराजकीय 'साष्टांग दंडवत' आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांची फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय कळवण्यात येईल आश्वासन दिले. त्यानंतर काही तासातच शिंदे - फडणवीस सरकारने या विद्यर्थ्यांना मोठा दिलासा दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.