mseb sakal media
महाराष्ट्र बातम्या

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांकडून मारहाण; राज्यात सुमारे 150 घटना

पोलीस संरक्षण देण्याची संघटनेची मागणी

तेजस वाघमारे

मुंबई: कोरोना काळात (corona pandemic) ग्राहकांना आलेली भरमसाठ बिले वसुलीसाठी जाणाऱ्या (MSEB bill collection) महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर ग्राहकांनी (consumers beaten mseb employee) हल्ले केले. असेच प्रकार पुन्हा सुरु असल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या सुमारे 150 कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या घटना (one hundred and fifty cases) गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात घडल्या आहेत. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस (police protection demand) संरक्षण द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेने केली आहे. (MSEB employees beaten by consumers around one hundred and fifty cases in Maharashtra)

महावितरणची राज्यभरातील वीजग्राहकांकडे तब्बल 71 हजार 578 कोटी रुपयांचा थकबाकीचा डोंगर निर्माण झाला आहे. या आर्थिक संकटामुळे महावितरणच्या अस्तित्वाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. ग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे. मात्र तरीही ग्राहक बिले भरण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. थकीत रक्कम वसूल करण्याकरता महावितरणने सध्या मोठ्या प्रमाणावर राज्यभर मोहीम सुरु केली आहे. या कारवाईनुसार अनेक ग्राहकांचा विद्यूत पुरवठा खंडित केला आहे.

थकीत रक्कम वसूल करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये सुमारे १५० कर्मचाऱ्यांना ग्राहकांनी मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकारांमुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे, संघटनेचे सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी संघटनेने सरकार आणि प्रशासनाकडे वारंवार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : आमदार अपात्रतेप्रकरणी आठवड्याभरात निर्णय घ्या; अन्यथा कारवाई करू; सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना थेट इशारा

Crime: शरीरावर जखमा, फाटलेले कपडे, पुरूषाची चप्पल... रेल्वे स्थानकाजवळ अज्ञात महिलेचा अर्धनग्न मृतदेह अन्..., नेमकं काय घडलं?

Pune Petrol Pump Attack Criminals Arrested : पुण्यात नदीपात्रात दडून बसलेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना, पोलिसांनी सापळा रचून पकडलं!

Latest Marathi Breaking News:अमित ठाकरे यांची त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यावर पहिली प्रतिक्रिया

कलाकार खूप फॅन्सी जेवतात? मुळीच नाही, गिरीजा ओकने दाखवलं जेवणाचं ताट; वरणभात, अळूवडी अन्...

SCROLL FOR NEXT