msrtc 780 ST drivers honor across maharashtra republic day mumbai sakal
महाराष्ट्र बातम्या

Republic Day : राज्यभरात 780 एसटी चालकांचा गौरव

राज्यभरातील एसटीच्या 780 चालकांचा सपत्नीक सत्कार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : एसटी महामंडळातर्फे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आपल्या एकूण सेवेमध्ये सलग 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी विना अपघात सेवा बजावणाऱ्या राज्यभरातील एसटीच्या 780 चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

मध्यवर्ती कार्यालयात उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पितळी बिल्ला यासह पत्नीला साडी व रोख 25 हजाराचा धनादेश देत 25 वर्ष विना अपघात सेवा बजावणाऱ्या अशोक पालवे, सिध्दार्थ जाधव आणि शिवशरणप्पा चौधरी या चालकांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक वाहतूक शिवाजी जगताप, महाव्यवस्थापक कर्मचारी वर्ग अजित गायकवाड, महाव्यवस्थापक नियोजन व पणन जयेश बामणे,

महाव्यवस्थापक भांडार खरेदी दिलीपकुमार चौधरी मुख्य सांख्यिकी अधिकारी संध्या भंडारवार, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी सोमनाथ तिकोटकर यांच्या सह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यभरात प्रत्येक विभागीय कार्यालयामध्ये उर्वरित चालकांचा सत्कार विभाग नियंत्रक यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT