Video Viral Sakal
महाराष्ट्र बातम्या

उडतं छप्पर, गळक्या बसनंतर आता एसटीचा नवा व्हिडिओ! भर पावसात हाताने फिरवावे लागतेय वायपर | Video Viral

दत्ता लवांडे

ST Viral Video : मागच्या काही दिवसांपूर्वी छप्पर उडणाऱ्या बसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये बसचे छप्पर उडत असतानाही गाडी भरधाव वेगाने धावताना दिसत होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महामंडळाने संबंधित अभियंत्यावर कारवाई करत निलंबीत केलं आहे. त्यानंतर आता एसटी बसमध्ये पावसाचं पाणी गळतानाचा सुद्धा व्हिडिओ समोर आला होता.

एसटी महामंडळाच्या बसची ही अवस्था समोर येऊ लागल्याने अनेक स्तरातून सरकारवर टीका केली जात आहे. त्यातच एसटीचा अजून एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये भर पावसामध्ये चालकालाच समोरील काचेवरील पाणी साफ करावे लागत आहे. चालक वायपर हाताने फिरवताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. काचेवरील पाणी पुसत गाडी चालवण्याची कसरत चालकाला करावी लागत आहे. एका प्रवाशाने हा व्हिडिओ शूट केला आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत अनेकदा एसटीच्या बिकट अवस्थेचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामधून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी किती खिळखिळी झाली आहे याचं दर्शन होतं.

महामंडळाकडून अनेक नवनव्या बस रस्त्यावर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून अनेक वेगवेगळ्या एसटी बसेस रस्त्यावर आणल्या गेल्या आहेत. त्यामध्ये हिरकणी, शिवशाही, शिवनेरी, शिवाई, शिवाई इलेक्ट्रीक, परिवर्तन अशा वेगवेगळ्या आणि अद्ययावत तंत्रज्ञान असलेल्या बसचा सामावेश आहे.

तर प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी नवनवे उपक्रमही महामंडळाकडून राबवले जात आहेत. महिलांना प्रवासामध्ये ५० टक्के सूट दिल्यामुळे महामंडळाला फायदा झाला आहे. पण जुन्या बसेस अजूनही रस्त्यावर असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT