ST Video Viral Sakal
महाराष्ट्र बातम्या

निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान! ST महामंंडळाची 'शिवशाही' बस अडकली खड्ड्यात; Video होतोय Viral

गतिमान सरकारमधील रस्त्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे.

दत्ता लवांडे

सोशल मीडियावर मागच्या काही दिवसांपासून एसटी बसचे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. छप्पर उडणाऱ्या बसचा व्हिडिओ, छतामधून पाणी गळणाऱ्या बसचा व्हिडिओ, समोरील काचेवरील पावसाचे पाणी हाताना वायपर फिरवून साफ करणाऱ्या ड्रायव्हरच्या बसचा व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. तर आता रस्त्यावरील खड्ड्यात अडकलेल्या एसटी बसचा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एसटीची शिवशाही ही बस रस्त्यावरील एखा खोल खड्ड्यामध्ये अडकलेली दिसत आहे. तर एसटीचा पाठीमागचा भाग यामुळे तुटलेला दिसत आहे. चालक आणि वाहक खाली उतरल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर या व्हिडिओनंतर सरकारवर निशाणा साधला जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारने "निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान" हा नारा लावला आहे. पण गतिमान सरकारच्या काळात खड्ड्यामध्ये बस अडकण्याच्या घटना घडत आहेत. हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग असल्याचं बोललं जातंय, तर व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

एसटीचे उत्पन्न वाढले

महाराष्ट्र सरकारने महिलांना प्रवासात ५० टक्के सूट दिल्यानंतर एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. तर मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळातील दुरावस्थेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. छप्पर उडालेल्या बसच्या व्हिडिओप्रकरणी संंबंधित अभियंत्याला निलंबीत करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT