strike period st bus employee Dead Compensation Give  sakal
महाराष्ट्र बातम्या

ST संपाचा तिढा सुटेना; अहवाल सादर करण्यास 'तारीख पे तारीख'

अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने समितीला दिली 'ही' तारीख

सुधीर काकडे

एसटी (MSRTC) विलीनीकरणासंदर्भात त्रिसदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी वेळ वाढवून देण्यासाठी काल राज्य सरकारतर्फे मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) केला होता. आज या प्रकरणावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. कारण अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाने दिलेली 12 आठवड्यांची मुदत संपली आहे. सरकारी वकिल एस नायडू यांनी पून्हा 18 फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितली आहे.

विलीनीकरणाचा अहवाल अंतिम टप्यात असल्याचं समितीकडून सांगण्यात आलं आहे. यावर न्यायालयाने 22 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे. पुढील सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार असून, 18 फेब्रुवारीपर्यंत अहवाल सिल बंद पाकिटात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं ही मागणी घेऊन मागच्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आतापर्यंत वेगवेगळे टप्पे पाहायला मिळाले आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या काही प्रमुख संघटनांच्या नेत्यांनी संप मागे घेतला असला तरी, बहुतांश कर्मचाऱ्यांनी विलीनीरण होत नाही तोवर कामावर हजर होणार नाही अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळे आता आणखी किती काळ एसटीची चाके थांबलेली राहणार याकडे राज्यातील सर्व सामान्य प्रवाशांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT