uddhav thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात २२ ऑक्टोबरपासून मल्टिप्लेक्स थिएटर सुरु होणार

सकाळ डिजिटल टीम

मल्टिप्लेक्स थिएटर सुरु करण्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या वर्षा या निवासस्थानी बैठक सुरु आहे.

कोरोनामुळे राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्याअंतर्गत मल्टिप्लेक्स थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मल्टिप्लेक्स थिएटर सुरु करण्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या वर्षा या निवासस्थानी बैठक सुरु आहे. यामध्ये थिएटर्स २२ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याची असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेना नेते संजय राऊत आणि चित्रपट निर्माते रोहित शेट्टी हेसुद्धा बैठकीला उपस्थित आहेत. राज्यातील मंदिरे सुरु करण्याचा निर्णय कालच जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर चित्रपटगृहेसुद्धा लवकर सुरु करण्याची मागणी केली जात आहे. अनेक कलाकारांनी ही मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे.

राज्यातील अनेक ज्येष्ठ कलाकार त्यांना भेडसावणाऱ्या आर्थिक संकटाबद्दल सोशल मीडियावर व्यक्त झाले आहेत. तसंच थिएटर चालक, मालक आणि त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांची मागणीही विचारात घेतली गेली नाही. यामुळे सध्या वाद सुरु झाला. देशातील इतर राज्यांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन थिएटर सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही थिएटर्स सुरु कऱण्याची मागणी केली जात आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. शुक्रवारी राज्यात ३ हजार २८६ नवे रुग्ण सापडले तर ५१ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात ६५ लाख ३७ हजार ८४३ जणांना कोरोनाची लागण झाली. तर १ लाख ३८ हजार ७७६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. गेल्या २४ तासात राज्यात ३ हजार ९३३ जण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात ३९ हजार ४९१ सक्रीय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT