Mumbai-Local-Train sakal
महाराष्ट्र बातम्या

Railway News : मोठी बातमी! 'या' २४ रेल्वे स्थानकांवर 'टीसीं'कडे असणार बॉडी कॅमेरे

संतोष कानडे

मुंबईः रेल्वेमध्ये फुकटात प्रवास करणारे महाभाग कमी नाहीत. शिवाय तिकीट नसतांना 'टीसी'शी वाद घालणारे अनेकजण असतात. त्यामुळेच आता सेंट्रल रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

सुरळीत आणि पारदर्शक तिकिट व्यवस्थापनासाठी आता टीसींकडे बॉडी कॅमेरे असणार आहेत. २४ रेल्वे स्थानकांवर असे कॅमेरे टीसींकडे असतील. पुढच्या आठवड्यापासून रेल्वे प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या स्थानकांसह २४ रेल्वे स्टेशन्समध्ये टीसींकडे बॉडी कॅमेरे असतील.

यासह हार्बर लाईनवरही बेलापूर, पनवेल, वडाळा, वाशी, नेरुळ, कोपरखैरने या स्थानकांमध्ये टीसींकडे बॉडी कॅमेरे असतील. त्यामुळे चोरीने प्रवास करणारे, हुज्जत घालणारे आणि इतर घटनांवर पायबंद घालण्यास मदत होणार आहे.

मे २०२३मध्येच सेंट्रल रेल्वेने ५० बॉडी कॅमेरे टीसींना पुरवण्यासंबंधी माहिती दिली होती. रेल्वेने संबंधित स्थानकांवर कॅमेरे पुरवले आहेत. या कॅमेऱ्यांवर 'तुम्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहात' असं नमूद करण्यात आलेलं आहे. सदरील बॉडी कॅमेरे हे एचडी व्हीडिओ शूट करतील. शिवाय रात्रीदेखील क्लेअर व्हीडिओ शूट होईल. यामुळे गैरप्रकार टाळण्यास आणि उत्पादकता वाढण्यात मदत होणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment : पीएम किसान योजनेचा २४ वा हप्ता जारी; ९.३० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपयांची रक्कम हस्तांतरित

IND vs NZ: इशानची एन्ट्री, वैभव सूर्यवंशी पुन्हा बाकावर! भुवनेश्वर कुमारही OUT, श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केले धडाधड बदल

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया अडकणार लग्नबंधनात? नात्याची कबुली देत म्हणाली...

Cyclone Arnab: अर्नब चक्रीवादळानंतर आंध्रात आता 'राजकीय वादळ'; सरकारवर काय होतोय आरोप?

Marathi News Live Updates : टोरेंट कंपनीच्या विरोधात २ नोव्हेंबर रोजी कर्जत बंदची हाक

SCROLL FOR NEXT