bullet train project sakal
महाराष्ट्र बातम्या

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूमी अधिग्रहण पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम दोन्ही राज्यात वेगात सुरू झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम दोन्ही राज्यात वेगात सुरू झाले आहे. गुजरातमधील स्थापत्य कामे वेगात सुरू असून आता दोन्ही राज्यातील जमीन अधिग्रहण ९९.९५ टक्के पूर्ण झाले असल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे.

एनएचआरसीएलने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण ९९.९५ टक्के भु संपादन पूर्ण झालं आहे. त्यापैकी गुजरातमध्ये १०० टक्के भूसंपादन झाले आहे. तर महाराष्ट्रात ९९.८३ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पासाठी एकूण १३८९.४९ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे.

यापैकी गुजरात राज्यात ९५१.१४ हेक्टर, डहाणूमध्ये ७.९० हेक्टर तर महाराष्ट्रात ४२९.७१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. उर्वरीत ०.२७ टक्के जमीन अधिग्रहणाबाबत प्रक्रिया सुरू असून लवकरच ही जमीन प्रकल्पासाठी मिळेल.

महाराष्ट्रातील ठाणे येथील डेपोच्या कामासाठी मोठ्या मशिनरी जाण्यासाठी लागणाऱ्या एका अप्रोच मार्गाची आवश्यकता आहे. या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहणाबाबत नोटिफिकेश जारी झाले असून लवकरच प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दरम्यान, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची कामे प्रगती पथावर आहेत. मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील स्थानकाचे काम सुरू झाले आहे. तर या मार्गातील एकमेव भुयारी मार्गाचे काम मुंबईत बिकेसी येथे सुरू झाले आहे. नुकताच सर्वात मोठा स्टील ब्रिज उभारून प्रकल्पांचा महत्वाचा टप्पा पार झाला आहे. तर एका माऊंटन टनेलचे कामही पूर्ण झाले आहे.

भारतातील पहिला समूद्रातील बोगदा या मार्गासाठी बांधण्यात येणार आहे. बिकेसी ते शीळ फाटा दरम्यान ठाणे खाडीच्या मधून बांधण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Sugar Mill Opening : साखर कारखाने सुरु करण्यासंदर्भातील राजु शेट्टींची मागणीची मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडुन पाठराखण

लेट पण थेट! 'या' मुलांकाला जन्मलेल्या लोकांचे उशिरा होतात लग्न, लाईफ पार्टनर असा मिळतो की...

Latest Marathi News Live Update : नितेश राणेंविरोधात लुकआऊट नोटीस काढल्याचा अखिल चित्रेंचा आरोप

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

SCROLL FOR NEXT