Mumbai International Airport sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai Airport : मंगळवारी सहा तासांसाठी मुंबई विमानतळ बंद असणार; 'हे' आहे कारण...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या पावसाळ्यानंतर नियोजित देखभाल दुरुस्तीसाठी उद्या (ता. १७) बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे.

सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत धावपट्टींची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे अंदाजित ५०० पेक्षा अधिक विमानसेवांना फटका बसणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील सर्वांत व्यग्र विमानतळांपैकी एक आहे. येथून दररोज ९५० हून अधिक विमानांची ये-जा होते. दोन धावपट्ट्यांपैकी मुख्य धावपट्टीवरून तासाला ४६ विमानांची ये-जा होते; तर दुसऱ्या धावपट्टीवर तासाला ३५ विमानांची ये-जा होते.

पावसाळ्यानंतर विमानाचे आगमन आणि उड्डाणे सुरक्षित व्हावीत म्हणून दरवर्षी धावपट्टीची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यंदाही मुंबई विमानतळ प्रशासनाने १७ ऑक्टोबरला दोन्ही धावपट्ट्या आरडब्ल्यूवाय ०९/२७ आणि आरडब्ल्यूवाय १४/३२ तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहेत.

या संदर्भात सहा महिने आधी ‘नोटीस टू एअरमेन’देखील जारी करण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Gas Leak: पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती; २४ नागरिकांना त्रास, मोठा अनर्थ टळला!

Arvind Sawant railway issue : मुंबई-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी, मुंबई-पंढरपूर आणि नांदेड-पुणे रेल्वे सुरू होणार का? खासदार अरविंद सावंत आक्रमक

Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

Newlywed Bride Death : लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी नववधूचा अंत, रिसेप्शनहून परतताना अपघात; काका आणि मामाचाही मृत्यू, गाडीचं चाक निखळलं अन्...

लग्नात गायत्री दातारची आई असं काय म्हणाली की नवरा श्रीकांत मंडपातच रडायला लागला? व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT