Ameya Khopkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ameya Khopkar: ...तर शिवसेनेच्या नेत्यांना घरात घुसून मारेल; खोपकरांचा थेट इशारा

संतोष कानडे

Mumbai: शिवसेनेचे नेते माझ्यावर खालच्या पातळीवर टीका करत असतील तर मी त्यांना घरात घुसून मारेन, अशा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे.

Amey Khopkar Kishori Pednekar

काल अमेय खोपकर यांनी एक ट्विट करुन वादाला तोंड फोडलं होतं. ''ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षे भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना, मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा'' असं ट्विट खोपकर यांनी केलेलं.

या ट्विटनंतर आरोप-प्रत्योरोप सुरु आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीही खोपकरांना टार्गेट केलं होतं. त्याला उत्तर देतांना खोपकर म्हणाले की, मी माझ्या विधानावर ठाम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अशा विषयांवर बोलू नये. सध्या त्यांचं पक्षातलं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे. सुषमा अंधारे यांचं पक्षामध्ये वजन वाढत आहे. त्यामुळे पेडणेकरांना त्रास होतोय. परंतु माझ्यावर जे शिवसेनेचे नेते खालच्या पातळीवर टीका करतील त्यांना घरात घुसून मारेन, असा दम त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT